ETV Bharat / state

Pune Crime: हडपसरमध्ये गॅंगवॉर टोकाला; मर्डरचा रिप्लाय मर्डरचं म्हणत आरोपीवर कोयत्याने वार

author img

By

Published : Mar 30, 2023, 2:24 PM IST

२०२० मध्ये खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात असलेला परंतु आता जामिनावर बाहेर आलेल्या एकावर कोयत्याने वार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. तू अनिकेतचा मर्डर केला आहे ना, आता बघ मर्डरला मर्डर रिप्लाय देणार असे म्हणून शुभम भोंडे या गुन्हेगारावर भर रस्त्यात कोयत्याने वार करण्यात आला.

Pune Crime
आरोपीवर कोयत्याने वार

पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढत आहे. तसेच विविध गुन्ह्यांने शहरातील कायदा आणि सुव्यव्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात पुन्हा एकदा कोयता गँगकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पुण्यातील हडपसर परिसरात तर गेल्या काही दिवसांपासून गॅंगवॉर टोकाला गेले आहे. मर्डरचा रिप्लाय मर्डरचं म्हणत सराईत गुन्हेगारांकडून आरोपीवर कोयत्याने वार केला.


गुन्हा दाखल: पुण्यातील हडपसर परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी ओम उर्फ पिंटू भंडारी ( वय 23 ),सागर घायतडक ( वय 19 ) राजन लवांड ( वय 22 ),मेघराज शितोळे या चौघांविरुदध हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा दाखल झाला. आरोपींना पोलिसांकडून पकडण्यात आले आहे. यातील दोन आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. या प्रकरणी अनिकेत शुभम भोंडे हा जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.




मर्डरला मर्डरने रिप्लाय देणार: याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि शुभम भोंडे हे दोघे हडपसर येथील सरकारी 32 शाळा येथे सिगारेट ओढून रिक्षाने घरी जात असताना त्यांच्या समोर दोन दुचाकीवर चौघे आले. शुभम भोंडे हा सन २०२० मध्ये अनिकेत शिवाजी घायतडक याचे खुनाचे गुन्हयामध्ये जेलमध्ये होता. सध्या तो जामिनावर बाहेर आला आहे. त्याचा राग मनात धरुन आरोपी यांनी हातामध्ये धारधार शस्त्रे घेवुन शुभम याला रिक्षाच्या बाहेर ओढून, त्यांला लाथाबुक्कयांनी मारहाण करुन तु अनिकेतचा मर्डर केला आहे ना, आता बघ मर्डरला मर्डरने रिप्लाय देणार किंवा मला ५ लाख रुपये दे. आज तुला कायमचे संपवुनच टाकणार असे बोलून धारदार शस्त्राने डोक्यावर, डोळ्यावर व पाठीवर वार केला. जर कोणी मध्ये आले तर आम्ही कोणालाही सोडणार नाही असे बोलून दहशत निर्माण करुन निघून गेले. या प्रकरणी या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा: Pune Crime उसने पैसे परत मागितल्याने मित्रानेच मित्राचा केला गेम 2 फरारी आरोपींना पोलिसांकडून अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.