ETV Bharat / state

Ganeshotsav 2023: पुणे पोलिसांकडून गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण; 'असा' असेल पोलीस बंदोबस्त

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 26, 2023, 9:25 PM IST

Ganeshotsav 2023
गणेश विसर्जन

Ganeshotsav 2023 : यंदा मोठ्या उत्साहात गणेशोत्सव पार पडत आहे. पुणे पोलिसांनी गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीची देखील पूर्ण तयारी केलीय. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या. (Ganesha immersion procession)

पोलीस अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया

पुणे Ganeshotsav 2023: यंदाच्या वर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सवाला सुरवात झालीय. मोठ्या संख्येनं नागरिकांना आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन केलं होतं. या दहा दिवसाच्या उत्सवासाठी पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांच्या बरोबरच इतर मंडळांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली. अश्यातच येत्या दोन दिवसांनी म्हणजेच 28 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन होणार आहे. यासाठी पुणे पोलीसांनी मोठी तयारी केलीय. तब्बल 9 हजार पोलीस विसर्जन मिरवणुकीत तैनात करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिलीय.


'असा' बंदोबस्त असणार : यंदाच्या या विसर्जन मिरवणुकीसाठी 04 अप्पर पोलीस आयुक्त, 10 पोलीस उपायुक्त, 25 सहायक्क पोलीस आयुक्त, 155 पोलीस निरीक्षक, 578 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 6827 आंमलदर, 950 होमगार्ड आणि एसआरपीएफच्या 2 कंपन्या असा बंदोबस्त असणार आहे. (Ganesha immersion procession)

मिरवणुकीचे रस्ते पूर्णपणे बंद : पुणे शहरातील गणेशोत्सव देशभरात लोकप्रिय असल्यानं महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातुन तसंच भारतातील विविध राज्यांतुन गणेशभक्त पुणे शहरात येतात. येत्या 28 सप्टेंबरला शहरातील गणेशोत्सवाची सांगता होणार आहे. लाखोच्या संख्येनं गणेशभक्त मिरवणुकांमध्ये सहभागी होऊन श्री गणेशाला निरोप देणार आहेत. यंदाच्या वर्षी 3,865 सार्वजनिक गणेश मंडळे तसेच 6,14,257 घरगुती गणपतीची स्थापना झालेली आहे. यंदाच्या या गणेशोत्सवाकरीता पुणे शहरातील सार्वजनिक गणेश मंडळे, ढोलताशा पथके, आणि इतर संबंधित शासकिय विभाग यांच्यासोबत समन्वय बैठका घेण्यात आल्या आहेत. पुणे शहर पोलीस दलातील बीडीडीएस पथके, आरसीपी, क्युआरटी पथके गणेशोत्सव अनुषंगाने कार्यान्वित करण्यात आली आहेत. तसंच यंदाच्या या विसर्जन मिरवणुकीत रस्ते पूर्णपणे बंद राहणार आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असं आवाहन यावेळी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी केलंय. (Pune Police)


पुणे पोलिसांकडून संपूर्ण तयारी : यावेळी रितेश कुमार म्हणाले की, विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे पोलिसांकडून संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. तसंच मंडळांना देखील सूचना करण्यात आलेल्या आहेत. पुणे पोलीस दलातील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त सीसीटीव्हीद्वारे देखील विसर्जन मिरवणुकीवर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. तसंच विसर्जन मिरवणुक मंडळांना दोन ढोल ताशा पथक लावण्याची परवानगी देण्यात आली आहे, तर काही मानाच्या मंडळांसहित इतर मंडळांना तीन ढोल ताशा पथकाची परवानगी देण्यात आलेली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा विसर्जन मिरवणूक लवकर संपवणार असल्याचं यावेळी कुमार यांनी सांगितलंय.


तक्रारींचं प्रमाण कमी : तसेच ते पुढे म्हणाले की, यंदाच्या वर्षी नागरिकांची संख्या जरी जास्त आहे. या गणेशोत्सवाच्या काळात मोबाईल चोरी आणि विविध तक्रारींचं प्रमाण कमी झालेलं आहे. दहाही दिवस मोठा बंदोबस्त करण्यात आलाय. नागरिकांना तसंच गणेश मंडळांना कोणतीही गैरसोय पोलीस होऊ देत नाहीये. नागरिकांना आवाहन आहे की, ज्या पद्धतीनं गणेशोत्सवाच्या काळात त्यांनी पुणे पोलिसांना सहकार्य केलंय. तसंच सहकार्य विसर्जन मिरवणुकीत देखील करावं. असं देखील यावेळी कुमार म्हणाले.

हेही वाचा :

  1. Mahaprasad To Tekdi Ganesh : टेकडीच्या गणपतीला अकराशे एक किलो लाडूचा महाप्रसाद, पाहा व्हिडिओ
  2. Ruturaj Gaikwad Dagdusheth Ganpati Darshan : क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड सपत्नीक दगडूशेठ गणपतीचरणी लीन, पाहा व्हिडिओ
  3. Ganesh festival In Africa : सातासमुद्रापार बाप्पाचा जयजयकार! आफ्रिका खंडातील 'या' देशात मराठी लोकांकडून गणेशाची स्थापना
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.