ETV Bharat / state

Gautami Patil Dance Video : गौतमी पाटील चक्क नाचली बैलासमोर...पाहा व्हायरल व्हिडिओ

author img

By

Published : Apr 28, 2023, 1:52 PM IST

Updated : Apr 28, 2023, 5:36 PM IST

Gautami Patil Dance Video
गौतमी पाटील

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला लोक तासनतास आगोदर येऊन जागा पकडून बसलेले चित्र आपण नेहमी पाहत असतो. आता गौतमी पाटील ही एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. ते कारण म्हणजे लावणी कलाकार गौतमी पाटील ही चक्क बैलासमोर नाचतानाचा व्हिडिओ समोर सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

गौतमी पाटील ही चक्क बैलासमोर नाचतानाचा व्हिडिओ समोर सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

पुणे : गेल्या काही दिवसांपासून 'सबसे कातिल गौतमी पाटील' असे वाक्य तरुणाईच्या तोंडात पाहायला मिळते. राज्यात लावणी कलाकार गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यातच आता गौतमी पाटीलचा नवीन व्हिडिओ व्हायरल होत आहे.

गौतमी आणि बैलाची सोशल मीडियावर चर्चा : मुळशी तालुक्यात लग्नानिमित्त आयोजित मांडव टिळा कार्यक्रमाचा हा व्हिडिओ असल्याचे सांगितल जात आहे. या कार्यक्रमात गौतमी पाटील यांच्या लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बैलासमोर नृत्य सादर केल्याने गौतमी आणि त्या बैलाची चर्चा सद्या सोशल मीडियावर होऊ लागली आहे. बावऱ्या असे त्या बैलाचे नाव असल्याची माहिती समोर आली असून त्या बैलाने देखील डान्स शांतपणे पाहून गौतमीला दाद दिली.

व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय : बैलगाडा शर्यतीचे प्रतीक म्हणून या बावऱ्या बैलाला या कार्यक्रमात आणले. बैलाला सर्वात पुढे बांधण्यात आले होते. या बैलाने आतापर्यंत अनेक बैलगाडा शर्यतीमध्ये भाग घेतला असून त्या गाजवल्या देखील आहेत. गावामध्ये सर्वांचा तो लाडका आहे. तसेच गावची शान असलेल्या या बैलाची नेहमीच चर्चा असते. आत्ता त्याच्या समोर गौतमी पाटीलने डान्स केल्याने याची चर्चा आत्ता सर्वाधिक होत असून हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.


घरातील बैल कार्यक्रम स्थळी उभा केला : या व्हिडिओ बाबत कार्यक्रमाचे आयोजन राजेंद्र हगवणे यांनी सांगितले की, काळी लग्नाआधी दाराबाहेर मांडव घालण्याची प्रथा होती. त्या मांडवात नवऱ्या मुलाची वाजत गाजत बैलगाडीतून मिरवणूक येत होती. आणि हीच परंपरा कायम ठेवण्यासाठी मिरवणूक न काढता गीतांचा कार्यक्रम ठेवला आणि बैलगाड्याचे प्रतीक म्हणून घरातील बैल कार्यक्रम स्थळी उभा केला असल्याचे त्यांनी सांगितले. सुशील हागवणे युवा मंचच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चक्क कार्यक्रमासाठी बैल आणला होता.

हेही वाचा : Bollywood celebrity suicide : जिया खाननंतर फिल्म इंडस्ट्रीतील सुरू झालेले आत्महत्येचे सत्र सुरुच, 'या' सेलिब्रिटींनी संपले आयुष्य

Last Updated :Apr 28, 2023, 5:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.