ETV Bharat / state

Darshana Pawar murder case: दर्शना पवार एमपीएससीतून अधिकारी झाली अन् मित्रानेच घात केला? आरोपीला मुंबईतून अटक

author img

By

Published : Jun 22, 2023, 11:12 AM IST

Updated : Jun 22, 2023, 11:32 AM IST

किल्ले राजगडच्या पायथ्याशी तीन दिवसांपूर्वी एमपीएससी परिक्षेत तिसरी आलेल्या दर्शना पवार हिचा संशयास्पद मृतदेह हा सापडला होता. दर्शना पवार हत्या प्रकरणातील संशयित आरोपी राहुल हंडोरेला पुणे ग्रामीण पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे.

Darshana Pawar murder case
दर्शना पवार

पुणे: दर्शना दत्तू पवार मुळची अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावची होती. तिने स्पर्धा परिक्षेत फॉरेस्ट ऑफिसर (आरएफओ) म्हणून राज्यात तिसऱ्या क्रमांक पटकावला होता. दर्शना ही तीन दिवसांपूर्वी अकादमी तर्फे आयोजित सत्कार समारंभासाठी आली होती. सत्कारानंतर ती ट्रेकींगला गेली अन् परतलीच नाही. १२ जून रोजी दर्शना वारजेतील तिचा मित्र राहुल हांडोरे याच्यासोबत सिंहगड किल्याला ट्रेकींगसाठी जात असल्याचे सांगून गेली होती. पण, सायंकाळनंतर त्यांचे मोबाईल बंद लागले. त्यांच्या कुटूंबाने शोध घेतला. पण ते दोघेही सापडले नाहीत.

दर्शनाच्या कुटूंबियांनी पुण्यातील सिंहगड रोड आणि तिच्या बरोबर असलेल्या तिचा मित्र राहुलच्या कुटूंबियांनी वारजे माळवाडी पोलिसांकडे मिसींगची तक्रार दाखल केली होती. पण, दुर्दैवाने रविवारी तिचा मृतदेह आढळला. तिची ओळख पटवल्यानंतर पोलिसांकडून आता याप्रकरणाचा कसून शोध सुरू केला आहे. पोलिसांकडून राहुलचा शोध सुरू केला आहे. पण तो देखील गायब होता. अखेर त्याला मुंबई येथून अटक करण्यात आली आहे.


हत्येचे कारण आले समोर- दर्शना आणि आरोपी राहुल हे एकमेकांचे नातेवाईक असून दोघे एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत होते. दर्शनासोबत लग्न करण्याची राहुलची इच्छा होती. दोघेही एमपीएससीची परिक्षा देत होते. मात्र यात प्रयत्नांमधे दर्शनाला आधी यश आले. तिने वन विभागाची परिक्षा उत्तीर्ण केली. वन अधिकारी बनण्याची फक्त औपचारिकताच उरली होती. त्यानंतर दर्शनाच्या घरच्यांनी तिचे लग्न दुसर्‍या मुलासोबत जमवले. तिच्या लग्नाच्या हालचाली सुरु केल्या. त्यामुळे राहुल हंडोरे अस्वस्थ होता. एमपीएससीची परिक्षा उत्तीर्ण होण्यासाठी थोडा वेळ द्यावा, अशी त्याने तिच्या कुटुंबियाला विनंती केली. तो देखील परिक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनेल, असे त्याने दर्शना आणि तिच्या कुटुंबीयांना सांगून पाहिले. मात्र त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने राहुलने राजगडाच्या पायथ्याशी दर्शनाची हत्या केली.

खुनाबाबत तयार झाले होते रहस्य- एमपीएससीच्या परिक्षेत तिसरी आलेल्या दर्शना पवार हिच्या संशयास्पद मृत्यूच्या तपासासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी 5 पथके तयार केली होती. २६ वर्षीय दर्शना पवार हिचा राजगड किल्याच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने दर्शना हिच्यासोबत नेमके काय घडले ? असा प्रश्न सर्वांना पडला होता. तिच्या सोबत फिरायला तिचा मित्रदेखील गेला होता.

सीसीटीव्हीमध्ये राहुल गायब झाल्याचे कैद- दर्शनाचा मित्र सीसीटीव्हीत कैद झाला आहे. तेथून तो एकटा बाहेर पडताना कैद झाला आहे. दर्शना आणि राहुल दोघेही १२ जूनला राजगडावर दुचाकीने गेले. गडावर चढताना ते दोघे सीसीटिव्हीमध्ये दिसून आले. पण परताना तिचा मित्र राहुल हा एकटाच दिसला आहे. राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या एका हॉटेलच्या सीसीटीव्हीतून ही माहिती समोर आली आहे. त्यानंतर राहुल बेपत्ता झाल्याने पोलिसांचा त्याच्यावर संशय होता.

हेही वाचा-

  1. Mumbai Crime News: बनावट शेअर मार्केट चालवणाऱ्या टोळीतील आरोपीला अटक; 4 हजार 672 कोटी रुपयांचे झाले व्यवहार
  2. Suspicious Bag In Dadar : दादर फुलबाजारात संशयास्पद बॅग आढळल्याने पोलिसांची तारांबळ; बॅगेत आढळला गांजा
  3. Aryan Khan Bribery Case : समीर वानखेडे कथित खंडणी प्रकरणी सीबीआय शाहरूख खान, आर्यन खानचा जबाब नोंदवण्याच्या तयारीत
Last Updated : Jun 22, 2023, 11:32 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.