ETV Bharat / state

Aryan Khan Bribery Case : समीर वानखेडे कथित खंडणी प्रकरणी सीबीआय शाहरूख खान, आर्यन खानचा जबाब नोंदवण्याच्या तयारीत

author img

By

Published : Jun 21, 2023, 7:33 PM IST

Updated : Jun 22, 2023, 12:43 PM IST

Aryan Khan Bribery Case update
Aryan Khan Bribery Case update

सीबीआयचे माजी झोनल अधिकारी समीर वानखेडे कथित 25 कोटीच्या खंडणी भ्रष्टाचार प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. याप्रकरणी सीबीआय आता बॉलिवूड बादशाह शाहरुख खान आणि त्याचा मुलगा आर्यन खान यांचे जबाब नोंदवण्याची शक्यता आहे.

मुंबई : समीर वानखेडे यांनी आर्यन खान प्रकरणी खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात येत आहे. IRS अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधात सीबीआय अभिनेता शाहरुखचा मुलगा आर्यन खानचा जबाब नोंदवण्याची शक्यता आहे. तसेच सीबीआय शाहरुख खानचाही जबाब नोंदवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

CBI खान पिता-पुत्रांचे जबाब नोंदवण्याच्या तयारीत : कथित खंडणी भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयचे माजी झोनल अधिकारी समीर वानखेडे प्रकरणी सीबीआय आता बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान आणि त्याचा मुलगा आर्यन खान यांचा जबाब नोंदवण्याची शक्यता आहे. या प्रकरणाच्या तपासात सीबीआयने आतापर्यंत अनेकांचे जबाब नोंदवले आहेत. आता सीबीआय खान पिता-पुत्रांचे जबाब नोंदवण्याच्या तयारीत असल्याची माहिती सीबीआयच्या सूत्रांनी दिली आहे. एनसीबीचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांनी २५ कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहे.

25 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप : या प्रकरणी सीबीआयने अनेकांना जबाबदार धरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समीर वानखेडे यांच्या कथित खंडणी भ्रष्टाचार प्रकरणाची सीबीआय चौकशी करत आहे. सीबीआयने या प्रकरणात आतापर्यंत अनेकांचे जबाब नोंदवले आहेत. या दोघांचे जबाब नोंदवल्यानंतर समीर वानखेडेवरील खंडणीच्या आरोपांबाबत अधिक स्पष्टता येईल, अशी माहिती पुढे येत आहे. त्यांचे उत्तर दाखल करण्याची तारीख आणि वेळ अद्याप निश्चित झालेली नाही. मात्र त्यांचा जबाब लवकरच नोंदवला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. समीर वानखेडे आणि इतर काहींनी कॉर्डिनिया क्रूझ ड्रग प्रकरणात आर्यन खानला सोडण्यासाठी 25 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. त्याचप्रमाणे सीबीआयने समीर वानखेडे आणि त्याच्या पत्नीचा साथीदार क्रांती रेडकर यांचा फोनही जप्त केला आहे. त्याचप्रमाणे शाहरुख खानने समीर वानखेडेला केलेले मेसेजही समोर आले होते. मात्र, ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानबरोबर कोणतीही चर्चा झाली नसल्याची वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाती याचिकेत म्हटले होते.

हेही वाचा -

  1. Sameer Wankhede Bribe Case: सॅम डिसूजाला अटकेपासून संरक्षण नाहीच, चौकशीला सामोरे जाण्याचे हायकोर्टाचे आदेश
Last Updated :Jun 22, 2023, 12:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.