ETV Bharat / state

Dahi Handi 2023: राज्यातील पहिलं 'तृतीयपंथी गोविंदा पथक' पुण्यात; 50 पेक्षा अधिक तृतीयपंथी दहीहंडी फोडण्यास सज्ज

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 6, 2023, 11:37 AM IST

Updated : Sep 6, 2023, 3:18 PM IST

Dahi Handi 2023: देशभरात दहीहंडी उत्सव हा आनंदात साजरा केला जातो. दहीहंडीचं प्रमुख आकर्षण असते ते गोविंदा पथक. यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच तृतीयपंथीयांचं गोविंदा पथक दहीहंडीत सहभागी होणार आहे. ते राज्यातील पहिलं तृतीयपंथी गोविंदा पथक असणार आहे.

Dahi Handi 2023
दहीहंडी उत्सव 2023

राज्यातील पहिलं तृतीयपंथी गोविंदा पथक पुण्यात

पुणे : Dahi Handi 2023: महाराष्ट्रात दहीहंडी उत्सव (Dahi Handi) मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दहीहंडीला खेळाचा दर्जा दिल्यानंतर गोविंदा पथकात उत्साह पाहायला मिळत आहे. दहीहंडी उत्सवात राज्यभर ठिकठिकाणी गोविंदा पथकं उंचच्या उंच मानवी मनोरे रचून दहीहंडीला सलामी देतात. यात मोठ्या संख्येनं विजेत्यांना पारितोषिक देखील दिले जातात. गेल्या काही वर्षात पुरुषांच्या गोविंदा पथकांनंतर महिलांचं पथक देखील दहीहंडीसाठी तयार झाल्याचं पाहायास मिळत आहे. असं असलं तरी 'पुणे तिथं काय उणे' हे नेहमीच म्हटलं जाते. याची प्रचितीही नेहेमी आपल्याला पुण्यात पाहायला मिळते. पुण्यात आता तर राज्यातील पहिलं तृतीयपंथीयांचं गोविंदा पथक तयार झालं असून, या पथकाकडून जोरदार सराव सुरू आहे. (Dahi Handi In Pune)



तृतीयपंथीयांचं गोविंदा पथक तयार : मुंबई ठाण्यासह आता पुण्यातही मोठ्या जल्लोषांमध्ये दहीहंडी उत्सव साजरा होत असतो.अनेक आकर्षक बक्षीस हिंदी, मराठी, अभिनेते अभिनेत्री हे दहीहंडी उत्सवात प्रमुख आकर्षण असतात. विविध गोविंदा पथकं हे मनोरे रचून दहीहंडीला सलामी देतात. आता पुरुषांप्रमाणे ही महिलांची दहीहंडी तितक्याच जोरात होते. पण आता महाराष्ट्रातील पहिलं असं तृतीयपंथीयांचं गोविंदा पथक तयार होत आहे. ज्यात जवळपास 50 हून अधिक तृतीयपंथी यामध्ये सहभागी होत आहेत. यामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड मिळून या तृतीयपंथीयांनी चार गोविंदा पथक तयार करुन ते यंदा दहीहंडी उत्सव साजरा करणार आहेत.



महाराष्ट्रातील पहिलं तृतीयपंथी गोविंदा पथक : सर्वसामान्य नागरिकांप्रमाणं तृतीयपंथीयांना देखील मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध प्रयत्न शासनाकडून केले जात आहेत. पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका तर्फे तृतीयपंथीयांना सुरक्षा रक्षकाची नोकरी देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलं आहे. आता यातील काही तृतीयपंथी आणि मंगलमूर्ती किन्नर चॅरिटेबल ट्रस्टमधील तृतीयपंथी यांनी मिळून पुण्यामध्ये पहिल्यांदाचं महाराष्ट्रातील पहिलं तृतीयपंथी गोविंदा पथक तयार केलं आहे.



एकूण 4 पथकं तयार : सामाजिक कार्यकर्त्या शर्वरी गवंडे यांनी सांगितलं की, त्या गेली कित्येक वर्ष तृतीयपंथीयांसाठी काम करत आहे. त्यांच्या मनात विचार आला की, तृतीपंथीयांचं पथक तयार करावं. मंगलमूर्ती किन्नर चॅरिटेबल ट्रस्टशी बोलून तशी तयारी सुरू केली. सुरुवातीला या लोकांना त्रास झाला, पण आज पुणे आणि पिंपरी चिंचवडचे मिळून एकूण 4 पथक तयार झालं असल्याचं यावेळी शर्वरी गवंडे यांनी सांगितलं.

भोईराज यांनी दिली ट्रेनिंग : याबाबत मंगलमूर्ती किन्नर चॅरिटेबल ट्रस्टच्या कादंबरी म्हणाल्या की, जेव्हा ही संकल्पना आमच्या समोर आली, तेव्हा खूप चांगलं वाटलं. प्रेमाची, एकात्मतेची आणि समानतेची वागणूक जेव्हा आम्हाला मिळते, तेव्हा खूपच आनंद होत असतो. आम्ही तेव्हा सगळ्यांशी बोलून तयारीला लागलो. गोविंदा पथक तयार करत असताना कसे थर लावायचे, याबाबत काहीच माहिती नव्हती. पुण्यातील भोईराज पथकातील लोकांनी येऊन ट्रेनिंग आम्हाला दिली. सुरुवातीला पडलो लागलं. पुढच्या वर्षी यापेक्षा मोठे थर लावू आणि विविध मंडळाच्या दहीहंडी फोडायला देखील जाऊ, असं देखील यावेळी कादंबरी म्हणाल्या.

3 थर लावून दहीहंडी फोडणार : यावेळी गोविंदा पथकातील एक तृतीयपंथी गोविंदानं 'कशी तयारी करायची, याबाबत काहीच माहिती नव्हतं, पण काहीतरी आगळ वेगळं करत असल्यानं तयारी सुरू केली' असं सांगितलं. आता तर चांगली तयारी झाली असून, उद्याच्या दहीहंडीला 3 थर लावून दहीहंडी फोडणार असल्याचं त्यांनं सांगितलं.


तृतीपंथीयांना मंडळात बोलावलं : यंदाच्या वर्षी या तृतीयपंथीयांना दहीहंडी फोडण्यासाठी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी त्यांच्या मंडळात बोलावलं आहे. त्यांनी देखील खूप मदत केली आहे. तृतीपंथीयांना देखील समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम आपल्या सण उत्सवांच्या माध्यमातून करण्याचा हा एक प्रयत्न असल्याचं यावेळी दीपक मानकर यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. Dahi Handi २०२३ : आला रे आला गोविंदा आला! कोट्यवधींच्या बक्षिसांसोबतच राजकीय कलगीतुरा रंगणार
  2. Dahi Handi 2023 : गोविंदा मंडळांमध्ये दुफळी; 'हे' आहे कारण
  3. Janmashtami 2023 : जन्माष्टमीपूर्वी अशी सजली 'कृष्णभूमी' मथुरा, पहा मंदिरामधील विशेष सजावट
Last Updated :Sep 6, 2023, 3:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.