ETV Bharat / state

Pune crime : धक्कादायक.. पुण्यात रेडकासोबत अनैसर्गिक कृत्याचा प्रकार, आरोपीवर गुन्हा दाखल

author img

By

Published : Oct 28, 2022, 10:44 PM IST

Pune crime
पुण्यात रेडकासोबत अनैसर्गिक कृत्याचा प्रकार

पुण्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सध्या शहरात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढली असून, कोण काय करेल याचा नेम नाही. पुण्यात एकाने नदीपात्रात बांधलेल्या रेकडासोबतच अनैसर्गिक कृत्य केल्याचा ( unnatural act with Redak in Pune ) घृणास्पद प्रकार समोर आला असून, याप्रकरणी संबंधीत व्यक्तीवर डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे : पुण्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सध्या शहरात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढली असून, कोण काय करेल याचा नेम नाही. पुण्यात एकाने नदीपात्रात बांधलेल्या रेकडासोबतच अनैसर्गिक कृत्य केल्याचा ( unnatural act with Redak in Pune ) घृणास्पद प्रकार समोर आला असून, याप्रकरणी संबंधीत व्यक्तीवर डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ( crime against criminal ) करण्यात आला आहे.


आरोपीवर गुन्हा दाखल - दिपक बी. थापा असे आरोपीचे नाव असून थापा वर सध्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्यावर उपचार पूर्ण झाल्यावर त्याला अटक करण्यात येईल. याबाबत अक्षय हेमंत गुंजाळ (26, रा. गुंजाळवाडा, बुधवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. संबंधीत आरोपीवर अनैसर्गिक कृत्य तसेच प्राण्याचा छळ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


असा उघडकीस आला प्रकार - 27 ऑक्टोबर रोजी फिर्यादी अक्षय गुजाळ आणि त्याचे मित्र सचिन सोनवणे वृध्देश्वर-सिध्देश्वर घाट येथे कॉफी पित असताना रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीने त्यांना येऊन सांगितले की, बालगंधर्व पुलाखाली गुरांच्या गोठ्या जवळील एका झाडाला बांधलेल्या म्हशीच्या रेडकुसोबत एक व्यक्ती नैसर्गिक कृत्य करत आहे. त्यानंतर फिर्यादी लागलीचे तेथे गेले. त्यानाही एक व्यक्ती रेडकुसोबत अनैसर्गिक कृत्य करताना आढळून आली.

आरोपीचा पलायनाचा प्रयत्न - आरोपीला फिर्यादी येण्याची चाहूल लागताचा तो तेथून पळून जाऊ लागला. त्याचा पाठलाग केल्यानंतर त्याला पकडले असता त्याचे नाव विचारल्यानंतर त्याने त्याचे नाव दिपक असल्याचे सांगून तो नेपाळचा असल्याचे तो म्हणाला. आरोपी फिर्यादीच्या हातातून सटकून तो पुन्हा आंधारातून पळत जात असताना रोडवर पडल्याने त्याला मार लागला. तसेच हा प्रकार जमलेल्या लोकांनाही समजल्याने लोकांनीही त्याला मारहाण केली. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी पोलिस नियंत्रण कक्षाशी फोन करून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.