ETV Bharat / state

CM Eknath Shinde: नीलम गोऱ्हेंना मातृशोक; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली सांत्वनपर भेट

author img

By

Published : Feb 20, 2023, 8:09 PM IST

नीलम गोऱ्हे यांचे आईचे आज (20 फेब्रुवारी) निधन झाले. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी सांत्वनपर भेट घेतली. तसेच विविध क्षेत्रातील व्यक्तींनी देखील सांत्वनपर भेट दिली.

CM Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांत्वनपर भेट घेतली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नीलम गोऱ्हे यांची सांत्वनपर भेट घेतली



पुणे : विधानपरिषदेच्या उपाध्यक्षा डॉ. नीलम गो-हे यांच्या आई लतिका दिवाकर गोऱ्हे यांचे आज २० फेब्रुवारी रोजी सोमवारी सकाळी निधन झाले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज त्यांच्या आईंचे अंत्यदर्शन घेत सांत्वनपर भेट दिली. यावेळी विविध मान्यवरांनी तसेच राजकीय नेते मंडळी यांनी नीलम गोऱ्हे यांच्या घरी सात्वन पर भेट दिली.

नीलम गोऱ्हेंना मातृशोक: विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना उपनेत्या तसेच स्री आधार केंद्राच्या अध्यक्षा डॉ. नीलम ताई गोऱ्हे यांच्या मातोश्री लतिका दिवाकर गोऱ्हे (वय ८७) यांचे आज सोमवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या मॉडेल कॉलनी, पुणे येथील निवासस्थानी गेली ४२ वर्षे त्यांचे वास्तव्य होते.

लतिका गोऱ्हे यांचा परिचय: लतिका गोऱ्हे यांचा जन्म २ ऑगस्ट १९३५ रोजी पंढरपूर, जिल्हा सोलापूर येथे देशपांडे कुटुंबात झाला. त्यांचे वडील श्रीपाद आप्पाजी देशपांडे आणि आई अनुसया देशपांडे यांच्या सुसंस्कृत आणि मोठ्या कुटुंबात त्यांचे संस्कारपूर्ण शिक्षण झाले. या कुटुंबीयांचे विशाळगड संस्थानशी जवळचे संबंध होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचा विवाह प्रख्यात संशोधक व पशूवैद्यकीय तज्ञ डॉ. दिवाकर गोऱ्हे यांच्याशी झाला. विवाहानंतर लतिकाताईंनी पदवीचे बी .ए चे शिक्षण पूर्ण केले. विवाहानंतर त्यांचे वास्तव्य काही काळ बडोदा, मुंबई आणि त्या नंतर पुणे येथे ४२ वर्षे होते. साहित्याची त्यांना विशेष आवड होती. बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचे प्रकट वाचन त्यांनी केले होते.

विविध ठिकाणी भेटी: अमेरिका, श्रीलंका, फ्रान्स, भारत अशा विविध देशांना त्यांनी भेटी दिल्या होत्या. अखिल भारतीय महिला परिषदेच्या जळगाव व भारतातील महिला परिषदातही त्या सहभागी झाल्या होत्या. केदारनाथपासून ते कन्याकुमारीपर्यंतच्या विविध तीर्थ क्षेत्राना त्यांनी भेटी दिल्या होत्या. स्त्री आधार केंद्राला ३ जानेवारी २३ रोजी ३५ वर्षे पूर्ण झाल्याच्या कार्यक्रमात त्यांनी जाहीर भाषण देखील केले होते.

शिवसेनेसोबत जिव्हाळ्याचे संबंध: नीलमताईंच्या शिवसेनेतील माझा २५ वर्षे या पुस्तक प्रकाशनासाठी २०१८ मध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना भवनातील कार्यक्रमात त्या व्यासपीठावर उपस्थित होत्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्याशी त्यांचा चांगला परिचय होता. त्यांच्या पश्चात त्यांच्या दोन सुविद्य कन्या विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि औषधशास्त्र विभागात आशिया विभागात काम केलेल्या स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी आहेत. तसेच नातवंडे मुक्ता व हिमाद्री, सत्यजित व सतलज, रश्मी व नीरज, रोशनी व संबीत, असा मोठा परिवार आहे.

सामाजिक क्षेत्रातील कार्य: डॉ. दिवाकर गोऱ्हे यांच्यासोबत भारतीय अ‍ॅग्रो इंडस्स्ट्रीज फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मणीभाई देसाई आणि इतर पदाधिकारी यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. क्रांतिकारी महिला संघटना व स्त्री आधार केंद्र या दोन्ही संस्थांशी त्यांचे मातृत्वाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध होते. शिवाजीनगर महिला मंडळ, पुणे शहर महिला मंडळ, पंढरपूर महिला मंडळ, अन्नपूर्णा महिला मंडळ अशा विविध संस्थांवर त्यांचे कार्य राहिले आहे. काही संस्थांमध्ये उपाध्यक्ष व पदाधिकारी म्हणुन तीन दशके त्यांनी काम पाहिले आहे.

हेही वाचा: Kirit Somaiya Letter to EC: किरीट सोमैया यांचे केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र; संजय राऊत यांच्या '2000 कोटीच्या' आरोपाची दखल घेण्याची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.