Chandrakant Patil : तानाजी सावंतांच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया; म्हणाले...

author img

By

Published : Sep 26, 2022, 12:24 PM IST

Updated : Sep 26, 2022, 1:49 PM IST

Chandrakant Patil Reaction on Tanaji Sawant

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तानाजी सावंत यांच्या वक्तव्यावर आज भाष्य करताना माध्यमांशी संवाद साधला. तानाजी सावंत यांनी ( Chandrakant Patil Reaction On Tanaji Sawant ) एखादे वाक्य म्हटले की, त्याची तोडमोड करून ते समोर आणले जाते. त्यातला ग्रामीण आणि शहरी भावना व्यक्त करण्याचे समजले पाहिजे. आमच्या रावसाहेब दानवे यांच्याबाबतीत नेहमी हेच होते. पण, ग्रामीण भागातल्या लोकांना विचारलं की, ते म्हणतात यात काय आहे. तानाजी सावंतांना एवढेच म्हणायचे होते की, मराठा समाजाला आरक्षण जवळजवळ स्वातंत्र्यापासून पहिल्यांदा देवेंद्रजी यांनी दिले.

पुणे : राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे पुन्हा एकदा एका कारणामुळे चर्चेत आले आहेत. रविवारी उस्मानाबादमध्ये हिंदूगर्व गर्जना संवाद यात्रेदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ( Chandrakant Patil Reaction On Tanaji Sawant ) कार्यक्रमात सावंत यांची मराठा आरक्षणासंदर्भात भाष्य करताना जीभ घसरली. तुम्हाला मराठा आरक्षणाची खाज सत्तांतरण झाल्यानंतर सुटली, अशा शब्दांमध्ये सावंत यांनी विरोधकांना लक्ष्य केले. यावर आता विरोधकांकडून टीका होत आहे. आता यावर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil Reaction on Tanaji Sawant ) यांनी आपले मत व्यक्त केले ( Guardian Minister of Pune Chandrakant Patil Reaction ) आहे.

तानाजी सावंतांच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया

चंद्रकांत पाटील यांनी त्यांची बाजू मांडली : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, तानाजी सावंत यांनी एखादे वाक्य म्हटले की, त्याची तोडमोड करून ते समोर आणले जाते. त्यातला ग्रामीण आणि शहरी भावना व्यक्त करण्याचे समजले पाहिजे. आमच्या रावसाहेब दानवे यांच्याबाबतीत नेहमी हेच होते. पण, ग्रामीण भागातल्या लोकांना विचारलं की, ते म्हणतात यात काय आहे. ( Sawants Tongue Slipped While Commenting on Maratha Reservation ) तानाजी सावंतांना एवढेच म्हणायचे होते की, मराठा समाजाला आरक्षण जवळजवळ स्वातंत्र्यापासून पहिल्यांदा देवेंद्रजी यांनी दिले.

मागणी मान्य करायची असेल तर गैरसमज करू नये : बीजेपी सरकारने दिले ते हायकोर्टात टिकवले ते सुप्रीम कोर्टात एक वर्ष टिकवले. मग हे सरकार आले आणि यांना केस नीट चालवता आला नाही. त्यामुळे आरक्षण गेले. अडीच वर्षांत आंदोलन का केले नाही, असे तानाजी सावंत यांना म्हणण्याचा अर्थ आहे. माझी हात जोडून विनंती आहे की, ज्यावेळी एखादी मागणी मान्य करायची असेल, तेव्हा उठसूठ गैरसमज करून घेण्याची काही गरज नाही. त्यांचे पुढचे वाक्य हे होते की, आता आपले सरकार आलेय आपण करूया, असे यावेळी पाटील म्हणाले.

राज्यातील जनतेला सुख आणि समाधान मिळावे, अशी केली प्रार्थना : आजपासून सर्वत्र नवरात्र उत्सवाला सुरवात होत असून जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यातील महालक्ष्मी मंदिर येथे भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. राज्यातील जनतेला सुख आणि समाधान मिळावे, अशी प्रार्थनादेखील मी देवीचरणी केली आहे, असे यावेळी पाटील म्हणाले. यंदा सर्वच सण उत्सव निर्बंधमुक्त होत आहे. यावर पाटील म्हणाले की मी, असे आवाहन करेल की लोकशाही जशी चांगली आहे तशीच तिचा अतिरेक झाला तर तो तिकडे घातक आहे. त्याच प्रकारे निर्बंध असणे किंवा नसणार यात आपली स्वयंशिस्त असणे महत्त्वाचे आहे. गणेश विसर्जनाच्या वेळी जसे निर्बंधमुक्त वातावरण होते, त्याचा अर्थ लावला गेला की कोणतेही निर्बंध नाही त्याचा अतिरेक केला गेला. असे होऊ नये, असे यावेळी पाटील म्हणाले


पीएफआयचा विषय अत्यंत संवेदनशील असल्याने मी टीपण्णी करणार नाही : काल रात्री पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या वतीने जे आंदोलनात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या त्याबाबत पुणे पोलिसांकडून सुरुवातीला 124 अ हा कलम लावण्यात आला. नंतर तो काढण्यात आला. यावर पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, हा खूप संवेदनशील विषय आहे. अशा देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संवेदनशील असलेल्या विषयाने आपल्याला अपुरी माहिती असेल, तर आपण काही बोलू नये. मी यावर कुठलीही टिप्पणी करणार नाही. गृहमंत्री हे कायद्याचे तज्ञ आहेत. कायद्याचे विद्यार्थी आहेत. त्यामुळे ते याचा निर्णय करतील. हा खूप सेन्सेटिव्ह विषय आहे. गुप्तता राखण्याचा विषय आहे. पोलीस डिपार्टमेंट वर कोणीही प्रेशर आणू नये. तुम्ही काय करताय तुम्ही काय करताय असे विचारू नये, असे यावेळी पाटील म्हणाले.

पालकमंत्रीपदावर केले भाष्य : अजित पवार यांनी फडणवीस यांना 6 जिल्ह्यांचे पालकमंत्री पद दिले आहे. यावर टीका केली आहे. यावर पाटील म्हणाले की, अजित दादा विरोधी पक्षाचे नेते असल्यामुळे त्यांना तसे म्हणावे लागत असले हे जरी खरं असलं तरी अजितदादा वस्तुस्थिती जाणणारे आहेत असे मी मानतो. त्यामुळे सहा जिल्हे हे काय दोन वर्षांसाठी राहणार नाहीत. ही टाईम बिंग अरेंजमेंट आहे, असे यावेळी पाटील म्हणाले.

Last Updated :Sep 26, 2022, 1:49 PM IST

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.