ETV Bharat / state

ओझरमध्ये पहाटेच्या सुमारास दोन बिबट्यांचे आगमन, थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

author img

By

Published : Oct 27, 2019, 11:00 PM IST

अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र ओझर येथे आज पहाटेच्या सुमारास दोन बिबटे पाहायला मिळाले.

ओझरमध्ये पहाटेच्या सुमारास दोन बिबट्यांचे आगमन, थरार सीसीटिव्ही कँमेरात कैद

पुणे - अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र ओझर येथे आज पहाटेच्या सुमारास दोन बिबटे पाहायला मिळाले आहेत. रात्रीच्या अंधारात दोन बिबट्यांनी ओझरमध्ये फेरफटका मारला . हा सर्व थरार ओझर येथील आर्या हॉटेल व पार्किंग टोल नाक्यासमोरील सीसीटीव्ही कॅमऱ्यामध्ये कैद झाला आहे.

ओझरमध्ये पहाटेच्या सुमारास दोन बिबट्यांचे आगमन, थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद


जुन्नर तालुक्यात अनेक बिबटे वास्तव्यास असल्याचे नेहमीच आपण ऐकतो. मात्र भरवस्तीत ओझर गावांमध्ये अशाप्रकारे बिबट्यांचे अस्तित्व जाणवल्याने ओझर परिसरात बिबट्याची भीती निर्माण झाली आहे. वन विभागाच्या वतीने सातत्याने बिबट्याबाबत जनजागृती करण्यात येत असून आता नागरिकांनी सतर्कतेने राहण्याची गरज असल्याची भावना स्थानिक ग्रामस्थ व्यक्त करताना दिसत आहे.

Intro:Anc_सध्या दिपावलीचा उत्साह सर्वत्र पहायला मिळत आहे तर देवदर्शनाला नागरिकांचा कल वाढत असताना आता जंगली प्राणीही देवदर्शनाला जाताना दिसत असुन अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र ओझर येथे आज पहाटेच्या सुमारास दोन बिबट्यांनी विघ्नहर्त्याचे दर्शन घेण्यासाठी उपस्थिती लावली हा सर्व थरार ओझर येथील आर्या हॉटेल व पार्किंग टोल नाक्यासमोर सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

दिपावलीच्या दिवसांत श्रीक्षेत्र ओझर येथील मंदीराच्या समोरुन दोन बिबटे शांतपणे असे डौलाने चालत होते जाताना पहायला मिळाले सर्वत्र शांतता असताना या दोन बिबट्यांनी संपुर्ण ओझरमध्ये फेरफटका मारला आहे हि सर्व घटना सीसीटिव्ही कँमेरात कैद झाली आहे


जुन्नर तालुक्यात अनेक बिबटे वास्तव्यास असल्याचे नेहमीच आपण ऐकतो. मात्र भरवस्तीत ओझर गावांमध्ये अशाप्रकारे बिबट्यांचे अस्तित्व जाणवल्याने ओझर परिसरात बिबट्याची भीती निर्माण झाली आहे. वन विभागाच्या वतीने सातत्याने बिबट्या बाबत जनजागृती करण्यात येत असून आता नागरिकांनी सतर्कतेने राहण्याची गरज असल्याची भावना स्थानिक ग्रामस्थ व्यक्त करताना दिसत आहे.Body:....Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.