ETV Bharat / state

Sameer Wankhede Caste Verification Case : समीर वानखेडे या नावाने जात पडताळणी झालीच नाही! माहिती अधिकारात उघड

author img

By

Published : Dec 23, 2021, 9:24 AM IST

समीर वानखेडे
समीर वानखेडे

माहिती अधिकार कार्यकर्त्यांने माहिती अधिकारात समीर ज्ञानदेव वानखेडे या नावाने जात पडताळणी झाली आहे काय? (Sameer Wankhede Caste Verification Case) अशी विचारना (Sameer Wankhede Caste Case) जात पडताळणी प्रमाणपत्र समितीच्या मुंबई शहर कार्यालयाकडे केली होती. त्यावर कार्यालयाने सदर नावाची जात पडताळणी झाली नसल्याची माहिती दिली आहे.

पुणे (बारामती)- माहिती अधिकार कार्यकर्त्यांने माहिती अधिकारात समीर ज्ञानदेव वानखेडे या नावाने जात पडताळणी झाली आहे काय? (Sameer Wankhede Caste Verification) अशी विचारना जात पडताळणी प्रमाणपत्र समितीच्या मुंबई शहर कार्यालयाकडे केली होती. त्यावर कार्यालयाने सदर नावाची जात पडताळणी (Sameer Dnyandev Wankhede) झाली नसल्याची माहिती दिली आहे. (दि. १ नोव्हेंबर)रोजी बारामती तालुक्यातील करंजेपुल येथील नितीन संजय यादव यांनी ऑनलाइनद्वारे याबाबत माहितीची मागणी केली होती. त्यामध्ये ही बाब उघड झाली आहे.

जात पडताळणी प्रमाणपत्र संबंधित कार्यालयातून दिले गेले आहे का?

राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विधी विभागामार्फत मी गेल्या दीड महिन्यांपूर्वी एक ऑनलाइन आरटीआय जमा केला होता. त्या आरटीआयमध्ये मी अशी माहिती मागवली होती की, समीर ज्ञानदेव वानखेडे या नावाने त्यांच्याकडे कोणते जात पडताळणी प्रमाणपत्र संबंधित कार्यालयातून दिले गेले आहे का? जर दिले गेले असल्यास त्याच्या साक्षांकित प्रती मिळाव्यात अशी मागणी करणारा ऑनलाइन अर्ज जमा केला होता. त्यावर मला आज जिल्हा जात पडताळणी प्रमाणपत्र समिती मुंबई शहर कार्यालयाकडून ही धक्कादायक माहिती मिळाली असल्याचे नितीन यादव यांनी सांगितले.

प्रमाणपत्र सादर केले असेल तर ते कोणत्या नावाने?

संबंधित समितीमार्फत समीर ज्ञानदेव वानखेडे या नावाने कोणतीही जात पडताळणी प्रमाणपत्र तयार केलेले नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. जर समीर ज्ञानदेव वानखेडे नावाची व्यक्ती राज्य किंवा केंद्र सरकारच्या सेवेत असेल तर त्या व्यक्तीने जात पडताळणी प्रमाणपत्र जमा केले आहे की नाही? हा मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. जर त्यांनी प्रमाणपत्र सादर केले असेल तर ते कोणत्या नावाने? हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे असल्याचे यादव यांनी सांगितले आहे.

जात पडताळणी समितीकडून देण्यात आले

मुंबई एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. समीर वानखेडे यांचे जातप्रमाणपत्र बनावट (caste verification committee) असल्याचा आरोप करण्यात आला होता. आता या प्रकरणी समीर वानखेडेंना जात पडताळणी समितीसमोर ( Caste Verification Committee ) हजर व्हावे लागणार आहे. 14 डिसेंबर रोजी हजर राहण्याचा समन्स समीर वानखेडे यांना जात पडताळणी समितीकडून देण्यात आले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

जात प्रमाणपत्र खोटे असल्याची तक्रार केली होती

महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून आज समीर वानखेडे यांच्या जाती प्रमाणपत्र विरोधात आलेल्या तक्रारीची चौकशी सुरु करण्यात आली आहे. अशोक कांबळे या सामजिक कार्यकर्त्यांनी NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याची तक्रार केली होती. तसेच त्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली होती.

कार्यालयात सर्व कागदपत्र सादर केले

या तक्रारीनुसार महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत असलेली जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीने तक्रारदाराला पुरावे घेऊन माटुंगा रोड कार्यलयात बोलावले होते. तक्रारदार अशोक कांबळे यांचे वकील नितीन सातपुते यांनी कार्यालयात सर्व कागदपत्र सादर केले असून पुढील सुनावणी 14 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यादिवशी समीर वानखडे यांना देखील बोलवण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचा - शाळा बंद करण्याचा निर्णय नाही, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे स्पष्टीकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.