ETV Bharat / state

HSC Exam Copy Case: धक्कादायक! विद्यार्थ्यांना कॉपी करण्यास केली मदत; 9 शिक्षकांवर गुन्हा दाखल

author img

By

Published : Feb 28, 2023, 10:31 PM IST

Etv Bharat
Etv Bharat

दौंड तालुक्यातील केडगाव येथील जवाहरलाल विद्यालयातील धक्कादायक घटना समोर आली आहे. बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना कॉपी करण्यासाठी मदत केल्यामुळे 9 शिक्षकांवर यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 12 वी ची परीक्षा सुरू असताना भरारी पथकाने ही कारवाई केली आहे.

पोलिस उपअधीक्षक राहुल धस माहिती देताना

दौंड (पुणे): राज्यात सध्या बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. यासाठी शासनाकडून मुक्त अभियान राबिवले जात आहे. दरम्यान, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कॉपी करण्यास मदत केल्याचा प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांची अंग झडती न घेता त्यांना सामूहिक कॉपी करण्यासाठी अप्रत्यक्षरीत्या सहाय्य केले आहे. दौंड तालुक्यातील केडगाव येथील जवाहरलाल विद्यालयात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 12 वी ची परीक्षा सुरू असताना भरारी पथकाने ही कारवाई केली आहे. याप्रकरणी यवत पोलीस स्टेशन येथे 9 शिक्षकांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती यवत पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली आहे.


कॉपी करण्यास केली मदत: बारावीच्या परीक्षेसाठी शिक्षकांनी परिक्षा ही काॅपीमुक्त न करता विद्यार्थ्यांना मास काॅपी करण्यासाठी प्रतिबंध न करता त्यांची अंगझडती न घेता त्यांना काॅपी करणेसाठी उत्तेजन देवुन अप्रत्यक्ष रित्या सहाय्य केले आहे. दौंड तालुक्यातील केडगाव येथील जवाहरलाल विद्यालयातील प्रकार घडला आहे. विद्यार्थ्यांना कॉपी करण्यास प्रतिबंध न करता त्यांना अप्रत्यक्षरीत्या सहाय्य केल्याप्रकरणी परीक्षा केंद्र संचालकासह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी किसन भुजबळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा यवत पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला आहे.


गुन्हा दाखल झालेले शिक्षक: जालींदर नारायण काटे ( परिक्षा केंद्र संचालक), रावसाहेब शामराव भामरे ( उप केंद्र संचालक) प्रकाश कुचेकर, विकास दिवेकर, शाम गोरगल, काशीद कविता, गवळी जयश्री, होन सुरेखा, सोननवर अभय यांच्यावर यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असा आला प्रकार समोर: पोलिस उपअधीक्षक राहुल धस यांनी याप्रकरणी माहिती दिली आहे. ते म्हणाले की, दिनांक 27 फेब्रुवारी रोजी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील केडगाव येथील जवाहर विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय येथे बारावीच्या परीक्षेत दरम्यान जिल्हा परिषदेच्या भरारी पथकांनी मास कॉपी करण्याच्या संदर्भात ही कारवाई केली. त्या अनुषंगाने यवत पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र प्रेवेंशन ऑफ मॅन प्रॅक्टिसेस अँड युनिव्हर्सिटी बोर्ड, एक्झामिनेशन ऍक्ट 1982 कलम 8 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्हा हा परीक्षा केंद्र संचालक उपसंचालक व इतर शिक्षक असे एकूण नऊ जणांवर दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास यवत पोलीस स्टेशन करत आहे.

हेही वाचा: Thane Crime : पोलीस अधिकाऱ्याच्या खुर्चीत बसून इंस्टाग्रामवर व्हिडिओ व्हायरल करणारा 'बादशहा' तडीपार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.