ETV Bharat / state

Pune Builder Firing : व्हॉट्सॲप ग्रुपवरच्या चॅटिंगवरून व्यावसायिकाचा गोळीबार; एक जखमी

author img

By

Published : Jan 24, 2023, 5:20 PM IST

Pune Crime
व्हॉट्सॲप ग्रुपवरच्या चॅटिंगवरून व्यावसायिकाचा गोळीबार

पुणे शहरातील सिंहगड पोलीस चौकीच्या हद्दीत काल (सोमवारी) रात्री गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. व्हॉट्सॲप ग्रुपवरच्या चॅटिंगवरून झालेल्या बाचाबाचीत एका बांधकाम व्यावसायिकाने दुसऱ्या व्यक्तीवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, गोळीबार झालेल्या ठिकाणापासून सिंहगड पोलीस ठाणे हाकेच्या अंतरावर आहे.

पुणे : या गोळीबारात रमेश राठोड (रा. वारजे, पुणे) हे जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी संतोष पवार (रा. बावधन, पुणे) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर झालेल्या चॅटिंगवरून बाचाबाची झाली. अन् बांधकाम व्यावसायिक (जमीन विकसक) संतोष पवारने रमेश राठोडवर गोळीबार केला. सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या काही अंतरावरच ही गोळीबाराची घटना घडली आहे. संतोष पवार, देवा राठोड आणि रमेश राठोड यांच्यासह इतर काहीजण सिंहगड रस्ता परिसरातील सनसिटी रोडवरील योगीराज ऑटो सेंटरमध्ये बोलत थांबले होते.

व्हॉट्सॲप पोस्टवरून गोळीबार: देवा राठोड यांनी त्यांच्याकडे असलेल्या एका व्हॉट्सॲप ग्रुपवर संतोष पवार यांच्याबद्दल एक पोस्ट टाकली. त्यावरून संतोष पवार आणि देवा राठोड यांच्यात बाचाबाची झाली. दोघांच्या भांडणात रमेश राठोड हे मध्ये पडले. त्यावेळी संतोष पवारने त्याच्या कमरेला असलेले पिस्तुल काढून रमेश राठोड यांच्या दिशेने फायर केले. रमेश राठोड यांच्या पायाला गोळी लागली. जखमी राठोड यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


पोलिसांची घटनास्थळी धाव : घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता विभागाचे सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र गलांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जयंत राजुरकर व कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस करीत आहेत.

बांधकाम व्यावसायिकाची हत्या : राज्याची सांस्कृतिक राजधानी मानल्या जाणाऱ्या पुण्यात गोळीबार करून तरुणाची भरदिवसा हत्या करण्यात आली आहे. भारती विद्यापीठ परिसरातील चंद्रभागा हॉटेलसमोर दोघांनी 6 डिसेंबर, 2023 रोजी दुचाकीवरून येऊन एका व्यक्तीवर भरदिवसा गोळीबार केला होता. यामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता. समीर मनूर शेख असे या बांधकाम व्यवसायिकाचे नाव आहे. समीर मनूर शेख (वय 28, रा. फालेनगर, भारती विद्यापीठ) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव होता. तो काँग्रेस पक्षाचा असल्याची प्राथमिक माहिती समोर आली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पुण्यात खळबळ : पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, समीर हा चहा पिण्यासाठी चौकात आला होता. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी समीरवर सहा गोळ्या झाडल्या. यामध्ये समीरचा जागीच मृत्यू झाला. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आंबेगाव येथील चंद्रभागा चौकात गोळीबाराचा थरार घडला होता. यामुळे शहरात भरदुपारी गोळीबार झाल्याने मोठी खळबळ उडाली होती.

हेही वाचा : Case Against Gautami Patil : न्यायालयाने डीजे शो डान्सर गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करण्याचे दिले आदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.