ETV Bharat / state

Baramati Crime: प्रेमविवाह केल्याच्या रागातून प्रेयसीच्या भावासह आईचा तरुणावर जीवघेणा हल्ला

author img

By

Published : Nov 29, 2022, 10:54 AM IST

Baramati Crime: युवतीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून तिच्या भावाने व आईने ज्या युवकाशी तिने लग्न केले. त्याच्या भावावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना बारामतीत घडली आहे. बारामती शहर पोलिसांनी या प्रकरणी मयुर संजय चव्हाण व सुनीता संजय चव्हाण यांना दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

Baramati Crime
Baramati Crime

बारामती: युवतीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून तिच्या भावाने व आईने ज्या युवकाशी तिने लग्न केले, त्याच्या भावावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना बारामतीत घडली आहे. बारामती शहर पोलिसांनी या प्रकरणी मयुर संजय चव्हाण व सुनीता संजय चव्हाण (रा. लक्ष्मीनगर, माळेगाव काॅलनी) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात राजेंद्र बबन वाबळे (रा. लक्ष्मीनगर, माळेगाव काॅलनी, बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या शेजारीच संजय दिनकर चव्हाण हे राहतात.

प्रेमसंबंध न ठेवण्याची ताकीद दिली: फिर्यादीचा मुलगा अमोल याचे संजय यांच्या मुलीशी प्रेमसंबंध होते. दोन्ही कुटुंबांनी याबाबत या दोघांनाही यापूर्वी प्रेमसंबंध न ठेवण्याची ताकीद दिली होती. परंतु त्यानंतरही अमोल व मुलगी हे दोघे दि. २३ नोव्हेंबर रोजी ते पळून गेले होते. त्या दिवशी मयुर याने फिर्यादीला फोन करत माझ्या बहिणीला अमोल याने पळवून नेले आहे. त्याला घेवून तुम्ही अर्ध्या तासात घरी या, असे सांगितले. त्यावेळी फिर्यादी हे इचलकरंजीला कामानिमित्त गेले होते. दि.२४ रोजी ते घरी परत आल्यावर त्यांनी मुलाचा शोध सुरु केला.

कोणतीही तक्रार दिलेली नव्हती: त्या दिवशी सायंकाळी मयुर याने फिर्यादीचा मुलगा विकास राजेंद्र वाबळे याला अमोल व मुलगी कुठे आहे, ते सांग म्हणत त्याला मारहाण केली होती. परंतु यासंबंधी फिर्यादीने त्यावेळी कोणतीही तक्रार दिलेली नव्हती. दि. २५ रोजी ते मुलाचा शोध घेवून फिर्यादी सायंकाळी घरी आले असताना मयुर हा आई सुनिता चव्हाण यांच्यासोबत फिर्यादीच्या घरी आला. त्याने ते दोघे कुठे आहेत, अशी विचारणा केली. त्यावर आम्ही त्यांचा शोध घेत असून अद्याप तपास लागलेला नाही, असे फिर्यादी यांनी सांगितले.

प्रकरणाचा अधिकचा तपास पोलिसांकडे: यावर मयुर याने फिर्यादीचा मुलगा विकास याला शिवीगाळ करत माझी बहिण आत्ताच्या आत्ता इथे पाहिजे नाही, तर तुला आता जिवंत ठेवत नाही, असे म्हणत तेथे पडलेला दगड उचलून विकासच्या डोक्यात घातला. त्याला हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सुनिता चव्हाण यांनीही मारहाण केली. त्यामुळे विकास हा जागीच बेशुद्ध पडला. त्याला माळेगाव येथील काटे हाॅस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. तेथून बारामतीत गिरिराज हाॅस्पिटलला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.