ETV Bharat / state

Prahlad Singh Patel: बारामती लोकसभा मतदारसंघ भयमुक्त करण्याचा भाजपचा संकल्प- प्रल्हाद सिंह पटेल

author img

By

Published : Nov 13, 2022, 11:42 AM IST

Prahlad Singh Patel: मिशन बारामती हे भाजपने गांभीर्याने घेतले असून अवघ्या 2 महिन्यांच्या अंतरावरच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बारामतीचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग आणि जल शक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत.

Union Minister of State Prahlad Singh Patel
Union Minister of State Prahlad Singh Patel

बारामती: सर्वांना सोबत घेऊन सर्वाना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे, हेच भाजपचे मुख्य काम आहे. हे काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. केवळ आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नव्हे, तर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मतदारांच्या मनातील भीती दूर करून हा लोकसभा मतदारसंघ भयमुक्त करण्यासाठी भाजप काम करत आहे. २०२४ च्या लोकसभेला बारामतीत खासदारकीच्या रूपाने कमळ फुलणार असल्याचा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल यांनी व्यक्त केला आहे.

सीतारामन बारामतीचा दौरा करणार: मिशन बारामती हे भाजपने गांभीर्याने घेतले असून अवघ्या 2 महिन्यांच्या अंतरावरच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बारामतीचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग आणि जल शक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी येथील भाजप कार्यालयाला भेट दिली. व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

प्रधानमंत्री आवास योजना सुरु: पटेल पुढे म्हणाले, २०२४ ला बारामतीतून कोणत्याही परिस्थितीत भाजपचा खासदार निवडून जाईल. तो देशाच्या पंतप्रधान निवडेल आणि इथे येवून जनतेची सेवा करेल. २०१५ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री आवास योजना सुरु केली. त्यानंतर गेली आठ वर्षे विविध योजना राबविल्या जात आहेत. उज्ज्वला, स्वच्छता, शेतकरी सन्मान निधी अशा योजना राबविल्या आहेत. २०१९ ला पुन्हा संधी मिळाल्यानंतर हर घर जल योजना हाती घेतली गेली. आम्ही कधीही पक्ष पाहून विकासकामे करत नाही. कोणत्या जाती धर्माचे सरकार आहे हे बघत नाही.

नरेंद्र मोदीला साथ: जी योजना आणतो, ती समाजातील प्रत्येक गरजूला मिळाली पाहिजे, याचा विचार भाजपकडून केला जातो. घरे, गॅस, शौचालय या संबंधीच्या योजनात आम्ही कधीही भेदभाव केला नाही. आमची साथ सोडली तर कामे होणार नाही. ही लोकांच्या मनातील भीती आता राहिली नाही. विकासाला मतदान करणे म्हणजे नरेंद्र मोदीला साथ देणे आहे. त्यादृष्टीने बूथ बांधणी होणे गरजेची आहे. जगात कोणतेही काम अशक्य नसते. यामध्ये तर बारामती भयमुक्त करणे भाजपला अशक्य नाही. ज्यांची भीती आहे. ते स्वतः भीतीमध्ये वावरत आहेत. कोणतेही काम करताना पक्ष अथवा जातपात पाहून कामे केली जात नाही.

बारामतीत खासदारकीच्या रूपाने कमळ फुलणार: सर्वांना सोबत घेऊन सर्वाना विकासाच्या मुख्य प्रवाहात घेऊन भाजपचे काम करत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकास करत आहे. अत्यंत कठीण परिस्थितीतून भाजप हा पक्ष पुढे आला आहे. आज देशभर पक्षाचा विजय रथ दौडत आहे. देशातील अनेक राज्यात भाजप किंवा भाजप सहयोगी पक्षाचे सरकार आहे. २०२४ च्या लोकसभेला बारामतीत खासदारकीच्या रूपाने कमळ फुलणार असल्याचा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल यांनी व्यक्त केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.