ETV Bharat / state

पुण्यात भाजपचा पश्चिम महाराष्ट्र विजय संकल्प मेळावा; उदयनराजेंची दांडी

author img

By

Published : Sep 23, 2019, 9:38 PM IST

Updated : Sep 23, 2019, 9:54 PM IST

भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र विजयी संकल्प मेळाव्याचे पुण्यात आयोजन करण्यात आले होते. यावेळी नड्डा यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. साताराच्या खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये दाखल झालेले उदयनराजे भोसले मात्र यावेळी उपस्थित नव्हते.

पुण्यात भाजपचा पश्चिम महाराष्ट्र विजय संकल्प मेळावा घेण्यात आला

पुणे - भाजपच्या बाजूने लढाई लढत असलेला कार्यकर्ता राष्ट्रभक्तीची लढाई लढत आहे. देश आणि समाजाला बळकट करणारी लढाई आपण लढत आहोत. तर विरोधी पक्षातील निम्मे नेते एकतर तरुंगामध्ये आहेत किंवा जामीनावर आहेत, अशी टीका करत राज्यात पुन्हा सत्ता स्थापण्याची संधी आहे, जोमाने कामाला लागा, असे भाजप कार्याध्यक्ष जे पी नड्डा यांनी भाजप कार्यकर्त्यांना सांगितले.

पुण्यात भाजपचा पश्चिम महाराष्ट्र विजय संकल्प मेळावा घेण्यात आला

भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र विजयी संकल्प मेळाव्याचे पुण्यात आयोजन करण्यात आले होते. यावेळी नड्डा यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. साताराच्या खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये दाखल झालेले उदयनराजे भोसले मात्र यावेळी उपस्थित नव्हते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपने पश्चिम महाराष्ट्रातील प्रचाराचा नारळच फोडला असल्याचे भाजप नेत्यांनी यावेळी सांगितले. पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे खासदार, आमदार तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले हर्षवर्धन पाटील, रणजीतसिंह मोहिते पाटील हे नेते देखील व्यासपीठावर उपस्थित होते.

हेही वाचा -काळा चष्मा काढल्यानंतर त्यांना त्यांची काळी बाजू दिसायला लागली; अजित पवारांची पिचडांवर टीका

खरी लोकशाही केवळ भाजपमध्ये

दरम्यान, या मेळाव्याच्या माध्यमातून नड्डा यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्याचा प्रयत्न केला. देशात २३०० राजकीय पक्ष आहेत, त्यातील ७ राष्ट्रीय तर ६९ राज्य पातळीवरील पक्ष आहेत. या सगळ्यांत खरी लोकशाही केवळ भाजपमध्ये आहे. इतर पक्ष व्यक्तीनिष्ठ अथवा कौटुंबिक पक्ष आहेत, असे नड्डा यावेळी म्हणाले.

जम्मु-काश्मीरमध्ये आजवर केवळ ३ परिवारांचा फायदा

जगात आर्थिक मंदी असताना १ लाख ३४ हजार कोटींचा कर माफ करण्याचा धाडसी निर्णय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील या सरकारने घेतला. अनुच्छेद ३७० रदद् करण्याचा ऐतिहासिक निर्णय आम्ही घेतला. त्यासाठी संसदेच्या सभागृहात बहुमत घडवून आणले. या निर्णयामुळे जम्मू-काश्मीरसह संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण आहे. जम्मू-काश्मीरमध्ये आजवर केवळ ३ परिवारांचा फायदा झाला आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा -शिवसेना संपवू म्हणणाऱ्या नारायण राणेंना आमचा विरोध कायम - गुलाबराव पाटील

म्हणून ३७० हटवले....

एक देश, २ निशाण आम्हाला मान्य नाही. म्हणून आम्ही ३७० हटवले जेथे शामाप्रसाद मुखर्जींनी बलिदान दिले, ते काश्मीर आमचे आहे. त्यासाठी आम्ही ३७० काढून टाकले. नरेंद्र मोदींनी १०० दिवसात अनेक महत्वपूर्ण कामे केली. इकडे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप विधानसभा निवडणुकीला सामोरा जात आहे, असे नड्डा म्हणाले

Intro:पुण्यात भाजप कार्यध्यक्ष जे पी नड्डा यांच्या नेतृत्वाखालीच पश्चिम महाराष्ट विजय संकल्प मेळावा, उदयनराजे मात्र अनुपस्थितBody:mh_pun_02_bjp_sankalpa_melava_avb_7201348

Anchor
भाजपच्या बाजूने लढाई लढत असलेला कार्यकर्ता राष्ट्रभक्तीची लढाई लढत आहे देश आणि समाजाला बळकट करणारी लढाई आपण लढत आहोत तर
विरोधी पक्षातील निम्मे नेते एकतर जेलमध्ये आहेत नाहीतर बेलवर आहेत अशी टीका करत राज्यात पुन्हा सत्ता स्थापण्याची संधी आहे जोमाने कामाला लागा असे भाजप कार्याध्यक्ष जे पी नड्डा यांनी भाजप कार्यकर्त्याना सांगितले...भाजप च्या पश्चिम महाराष्ट्र विजयी संकल्प मेळाव्याचे पुण्यात आयोजन करण्यात आले होते यावेळी नड्डा यांनी कार्यकर्त्याना संबोधित केले...या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपने पश्चिम महाराष्ट्रातील प्रचाराचा नारळचं फोडला असल्याचे भाजप नेत्यांनी यावेळी सांगितले...पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे खासदार आमदार तसेच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मधून भाजप मध्ये दाखल झालेले हर्षवर्धन पाटील, रणजीतसिह मोहिते पाटील हे नेते देखील व्यासपीठावर उपस्थित होते मनात साताराच्या खासदारकीची राजीनामा देत भाजप मध्ये दाखल झालेले उदयनराजे भोसले मात्र यावेळी उपस्थित नव्हते, दरम्यान या मेळाव्याच्या माध्यमातून नड्डा यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्याचा प्रयत्न केला..देशात २३०० राजकीय पक्ष आहेत, त्यातील ७ राष्ट्रीय तर ६९ राज्य पातळीवरील पक्ष आहेत. या सगळ्यांत खरी लोकशाही केवळ भाजपमध्ये आहे, इतर पक्ष व्यक्तीनिष्ठ अथवा कौटुंबिक पक्ष आहेत
असे नड्डा यावेळी म्हणाले जगात आर्थिक मंदी असताना १ लाख ३४ हजार कोटींचा कर माफ करण्याचा धाडसी निर्णय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील या सरकारने घेतला, अनच्छेद ३७० रदद् करण्याचा ऐतिहासिक निर्णय आम्ही घेतला. त्यासाठी संसदेच्या सभागृहात बहुमत घडवून आणलं. या निर्णयामुळे जम्मु काश्मिर सह संपूर्ण देशात आनंदाचं वातावरण आहे. जम्मु काश्मिरमध्ये आजवर केवळ ३ परिवारांचा फायदा झालाय असे त्यांनी सांगितले
एक देश, २ निशाण आम्हाला मान्य नाही म्हणून आम्ही ३७० हटवलं जिथं शामाप्रसाद मुखर्जींनी बलिदान दिलं ते काश्मिर आमचं आहे त्यासाठी आम्ही ३७० काढून टाकलं, नरेंद्र मोदींनी १०० दिवसात अनेक महत्वपूर्ण कामं केली इकडे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सामोर जात आहे
जगात देशाची प्रतिमा नरेंद्र मोदींमुळे सुधारली, देशात महाराष्ट्राची प्रतिमा देवेंद्र फडणवीस यांनी सुधारली असे नड्डा म्हणाले...Conclusion:
Last Updated : Sep 23, 2019, 9:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.