ETV Bharat / state

Rohit Pawar Office Fire Case : रोहित पवार यांच्या हडपसर येथील कार्यालयात अज्ञात आरोपीने सायकलला लावली आग

author img

By

Published : Jul 16, 2023, 4:48 PM IST

आमदार रोहित पवार यांच्या पुण्यातील हडपसर येथील सृजन कार्यालयात एका अज्ञात व्यक्तीने अनधिकृतरीत्या कार्यालयात घुसून तिथे काम करत असलेल्या एका व्यक्तीच्या स्पोर्ट सायकलीला आग लावून नुकसान केले. ही घटना शनिवारी रात्री दोन वाजल्याचा सुमारास घडली आहे.

Rohit Pawar Office Fire
सायकल जाळली

पुणे: घटनेप्रकरणी हडपसर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. याबाबत सुनिल महादेव पाटील (वय ३० वर्षे, रा. फुरसुंगी) याने तक्रार दाखल केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हा रोहित पवार यांच्या हडपसर येथील जनसंपर्क कार्यालयात काम करीत होता. यावेळी एका अज्ञात व्यक्तीने ऑफिसच्या कंम्पाऊंडमध्ये प्रवेश केला. यानंतर त्याने बिल्डींग खाली उभी असलेली तक्रारदाराची हिरो कंपनीच्या सायकलला आग लावली. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत.


वैयक्तिक वैमनस्यातून घटना घडल्याचा अंदाज: याबाबत पोलिसांनी माहिती दिली की, तक्रारदार हा त्या इमारतीत वॉचमन म्हणून काम करतो. आमदार रोहित पवार यांच्या जनसंपर्क कार्यालयाशिवाय इतर कार्यालये देखील तिथे आहेत. तक्रारदाराचा जनसंपर्क कार्यालयाशी कोणताही संबंध नाही. तक्रारदार आणि आरोपी यांच्यातील काही वैयक्तिक वैरामुळे ही घटना घडली आहे, असे प्रथमदर्शनी दिसते. एफआयआर दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी दिली आहे.

रोहित पवार यांची प्रतिक्रिया नाही: रोहित पवार राष्ट्रवादी कर्जत- जामखेडचे आमदार आहेत. राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार हे पहिल्यांदाच कर्जत या आपल्या मतदारसंघात आले आहेत. अजित पवारांनी बंड केल्यानंतर रोहित पवार गेल्या काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेत असल्याने जाळपोळीच्या घटनेसाठी हा प्रकार कारणीभूत असावा का? अशी चर्चा सुरू आहे. घडलेल्या प्रकारानंतर रोहित पवार यांच्याकडून अद्यापपर्यंत कोणतीच प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल: आमदार रोहित पवारांच्या कार्यालयाच्या पार्किंगमध्ये असलेली एक सायकल आणि कार्यालयाची काही प्रमाणात जाळपोळ करण्यात आली आहे. शेजारीच असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तीन व्यक्ती येताना दिसत आहेत. या व्यक्ती कोण आहेत? त्यांनी कशामुळे आग लावण्याचा प्रयत्न केला? याची उत्तरे सध्या तरी अनुत्तरित आहेत. हडपसर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

हेही वाचा:

  1. Nagpur Crime News: मार्डच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह? महिला डॉक्टरचा 'तो' व्हिडीओ रेकॉर्ड करताना संशयित डॉक्टरला अटक
  2. Cheated By Instagram : इंस्टाग्रामद्वारे क्रिप्टोत पैसे गुंतविल्यास अर्ध्या तासात दुप्पट देतो सांगून फसवले
  3. Rape Case: चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या बापाला जन्मठेपेची शिक्षा; पीडितेच्या आईने न्यायालयासमोर केली पतीच्या सुटकेची मागणी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.