ETV Bharat / state

Militant Arrested In Pune: पुण्यात आणखी एका संशयित अतिरेक्याला अटक; पाच दिवसांची पोलीस कोठडी

author img

By

Published : Jul 27, 2023, 9:37 PM IST

Militant Arrested In Pune
संशयित अतिरेक्याला अटक

पुण्यात सुफा संघटनेतील दोन अतिरेकी सापडल्यानंतर एटीएसने आणखी मोठी कामगिरी करत इतर एकाला अटक केली आहे. अब्दुल कादीर असे संशयित तरुणाचे नाव आहे. आज त्याला पुणे कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्याला 5 तारखेपर्यंत एटीएस कोठडी सुनावली आहे. या तिघांनी पुण्यात दहशतवादी कारवाया घडवण्याचा कट रचला होता.

पुणे : येथे 18 तारखेला कोथरूड परिसरामध्ये टू व्हीलर गाडी चोरताना पुणे पोलिसांकडून दोघांना ताब्यात घेतले होते. अधिक तपास केला असता ते अतिरेकी असल्याचे समोर आल्यानंतर त्यांचा तपास एटीएसकडे देण्यात आला होता. चौकशीदरम्यान ते दोघेही इसिस प्रणित सूफा दहशतवादी संघटनेचे अतिरेकी असल्याचे समोर आले. त्यांनी राजस्थानमध्येही अतिरेकी कारवाया केल्या होत्या. त्यात फरार असलेले दोन आरोपी हे कोंढवा भागात राहात होते. त्यानंतर ते पुणे पोलिसांच्या हाती लागले आणि आता त्यांच्या कारवाईच्या संदर्भात सर्व तपास एटीएस करत आहे. तपासामध्ये एटीएसकडून पाच जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे; परंतु आज एका संशयित अतिरेक्याला अटक केली असून त्याला कोर्टात हजर करण्यात आले. त्यानंतर पाच तारखेपर्यंत एटीएसने मागणी केल्याप्रमाणे त्याला पाच दिवसांची कोठडी न्यायालयाने मंजूर केलेली आहे.

पुण्यात बॉम्बस्फोट करण्याचा होता बेत : माहितीप्रमाणे, पुण्यात बॉम्बस्फोट घडवण्यात येणार होता. त्याचे प्रशिक्षणसुद्धा त्याने गोंदिया येथे जंगलात जाऊन घेतले होते. त्या ठिकाणीसुद्धा एकाला अटक करण्यात आली. त्यांना मदत करणारा तो अतिरेकी असून त्याचे नाव अद्याप समोर आलेले नाही; परंतु त्या संदर्भातल्या ज्या वस्तू होत्या त्या पुणे पोलिसांनी जप्त केल्या होत्या. त्यात ड्रोन कॅमेरे, बॉम्ब बनवण्याचे साहित्यसुद्धा असल्याची माहिती एटीएसने दिलेली आहे. यापुढे आणखी तपास अधिक झाल्यानंतर सगळ्या गोष्टी पुढे येतील.

मोठा अतिरेकी घातपात उधळला : यापूर्वी एटीएस कडून महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान आणि महम्मद युनूस महम्मद अब्दुल कादीर या दोघांना अटक करण्यात आली आहे. आणखी 2 जणांना अटक करण्यात आलेली आहे; परंतु दोन अतिरेक्यांची नावे उघड करण्यात आलेली नाहीत. पुण्यामध्ये फार मोठा अतिरेकी कारवाया करण्याचा कट होता, अशी माहिती आता समोर येत आहे. याचा तपास करण्यात येत असल्यामुळे काही गोष्टी या सांगण्यात येत नाही. परंतु, यातून काहीतरी खूप मोठा अतिरेकी घातपात करण्याची शक्यता रचली जात असल्याची माहिती समोर आलेली आहे.

हेही वाचा:

  1. Terrorist Arrested: सुफा दहशतवादी संघटनेतील दहशतवाद्यांना पुण्यात अटक; गस्तीवरील दोन पोलिसांनी धाडसाने कशी कारवाई केली?
  2. ATS Busts Illegal Call Center : एटीएसने केला अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजचा पर्दाफाश
  3. Pune Terrorist : पुण्यात दहशतवाद्यांनी रचला होता बॉम्बस्फोटाचा कट; चौकशीत धक्कादायक माहिती उघड
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.