ETV Bharat / state

ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा रथ ओढण्याचा मान सर्जा-राजा बैलजोडीला; गावकऱ्यांनी काढली भव्य मिरवणूक

author img

By

Published : Jun 22, 2019, 5:23 PM IST

ज्ञानेश्ववर माऊलींचा पालखी सोहळ्याला २५ जूनला सुरुवात होणार आहे. या पालखीचा रथ ओढण्याचा मान देवाच्या आळंदी मधल्या रानवडे कुटुंबाच्या 'सर्जा राजा' बैलजोडीला मिळाला आहे. या जोडीची गावकऱ्यांनी वाजत गाजत मिरवणूक काढली.

सर्जा राजा बैलजोडीची भव्य मिरवणुक


पुणे - संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या आषाढी पायीवारी पालखी सोहळ्याचा रथ ओढण्याचा मान आळंदी देवाची मधल्या रानवडे कुटुंबाच्या 'सर्जा-राजा' बैलजोडीला मिळाला आहे. त्यामुळे रानवडे कुटुंबीयांसह वारकऱ्यांनी या सर्जा-राजाच्या जोडीची भव्य मिरवणूक काढली आहे.

सर्जा राजा बैलजोडीची भव्य मिरवणुक

सावळ्या विठूरायाच्या भेटीची आस पूर्ण करणाऱ्या पालखी सोहळ्याची लाखो वैष्णव वाट पाहतायेत. येत्या २५ तारखेला हा सोहळा सुरू होतोय. या सोहळ्यातली महत्वाची गोष्ट म्हणजे बैल जोडीचा मान. माऊलींचा पालखी रथ ओढण्याचा मान परंपरागत कुर्‍हाडे, घुंडरे, वहिले, रानवडे, भोसले, वरखडे यांच्याकडे असतो. यंदा हा मान पंडीत रानवडे कुटुंबीयांना मिळाला आहे.

आषाढी वारी पालखी सोहळ्याचा हा मान म्हणजे साक्षात विठ्ठलाची सेवा करण्याची संधी असते. म्हणूनच या बैल जोडीला विशेष महत्व असते. बैल जोडी आळंदीत दाखल झाल्यानंतर त्यांची मिरवणूक काढली जाते रानवडे कुटुंबीयांना हा मान मिळाल्यानंतर त्यांनीही मोठ्या श्रध्देन बैलांची मिरवणूक काढली. हा मान मिळाल्याने कुटुंबीय भलतेच खूश आहेत.

Intro:Anc__संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या आषाढी पायीवारी पालखी सोहळ्याचा रथ ओढण्याचा मान आळंदी देवाची मधल्या रानवडे कुटुंबाच्या सर्जा राजा बैलजोडीला मिळालाय.त्यामुळे रानवडे कुटुंबीयांसह वारक-यांनी या सर्जा-राजाच्या जोडीची भव्य मिरवणुक काढली आहे..

सावळ्या विठूरायाच्या भेटीची आस पूर्ण करणाऱ्या पालखी सोहळ्याची लाखो वैष्णव वाट पाहतायेत. येत्या २५ तारखेला हा सोहळा सुरु होतोय. या सोहळ्यातली महत्वाची गोष्ट म्हणजे बैल जोडीचा मान. माऊलींचा पालखी रथ ओढण्याचा मान परंपरागत कुर्‍हाडे, घुंडरे, वहिले, रानवडे, भोसले, वरखडे यांच्याकडे असतो. यंदा हा मान पंडीत रानवडे कुटुंबियांना मिळालाय.

आषाढी वारी पालखी सोहळ्याचा हा मान म्हणजे सुद्धा साक्षात विठ्ठलाची सेवा करण्याची संधी असते… म्हणूनच या बैल जोडीला विशेष महत्व असतं. बैल जोडी आळंदीत दाखल झाल्यानंतर त्यांची मिरवणूक काढली जाते… रानवडे कुटुंबियांना हा मान मिळाल्यानंतर त्यांनी ही मोठ्या श्रध्देन बैलांची मिरवणूक काढली…! हा मान मिळाल्याने कुटुंबीय भलतेच खुश आहेत.


Byte__पंडीत रानवडे__मानकरी

Byte__उमेश रानवडे_नागरिकBody:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.