ETV Bharat / state

Ajit Pawar : 'कंत्राटी भरतीनं नोकऱ्या जाणार असल्याचा गैरसमज पसरवला, आता माफी...', अजित पवारांची टीका

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 21, 2023, 1:29 PM IST

Updated : Oct 21, 2023, 2:51 PM IST

Ajit Pawar On contract Recruitment : कंत्राटी कर्मचारी भरतीवरुन राज्यभरात गदारोळ झाल्यानंतर राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारनं कंत्राटी कर्मचारी भरतीचा जीआर रद्द करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, यावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ajit pawar says misunderstanding spread about misconceptions about contract recruitment
उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे Ajit Pawar On contract Recruitment : राज्यातील कंत्राटी भरतीबाबत अकारण गैरसमज पसरवण्यात आला, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर केली. कंत्राटी भरतीचा निर्णय मागं घेतल्यानंतर ते आज माध्यमांशी बोलत होते. तसंच यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अगोदर कुणाच्या काळात कशा पद्धतीनं नोकर भरती झाली याविषयी काल पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली आहे. त्यातून वस्तुस्थिती समोर आली. आपल्या सरकारच्या काळात दीड लाख नोकर भरतीचा निर्णय घेण्यात आला असून याआधी एवढ्या मोठी भरती कोणत्याच सरकारच्या काळात झाली नसल्याचंही अजित पवार यावेळी म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार

माफी कोणी मागायची हे विरोधकांनी ठरवावं : आमच्या सरकारच्या काळात दीड लाख नोकर भरती आम्ही करत आहोत. कंत्राट भरतीचा निर्णय कुठल्या मुख्यमंत्र्यांच्या काळात कधी कसा निघाला, हे सगळं सांगितलेलं आहे. मी देखील सुधाकरराव नाईक यांच्या काळापासून काम करतोय. त्यामुळं मलाही चांगली माहिती आहे. त्यामुळं आता माफी कोणी मागायची हे विरोधकांनी ठरवायचंय. आर आर पाटील यांच्या काळात 65 हजार भरती आम्ही केली होती. त्यानंतर ही सगळ्यात मोठी भरती असल्याचंही अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.

वडगाव शेरी मतदार संघात केली कामांची पाहणी : आज अजित पवार यांनी वडगाव शेरी मतदार संघात महापालिकेच्या वतीनं सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. येरवड्यात नदीसुधार योजना तसंच खराडीमध्ये ऑक्सिजन पार्क आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाचं काम सुरू आहे. या कामांचा आढावा घेण्यासाठी अजित पवार सकाळी 6.30 वाजताच त्याठिकाणी पोहोचले. सामान्य नागरिकांना त्रास होऊ नये, म्हणून सकाळी लवकर पाहणीसाठी आल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच कुठलाही प्रकल्प किंवा विकास काम करत असताना त्याच्या दोन्ही बाजू समजावून घेणं गरजेचं आहे. त्याबाबतचा निर्णय जनतेवर लादला गेला असं जनतेला वाटायला नको, असंही ते यावेळी म्हणाले.

हेही वाचा -

  1. Devendra Fadnavis On Contract Recruitment : कंत्राटी भरती 'महाविकास आघाडी'चं पाप; 'तो' जीआर रद्द - देवेंद्र फडणवीस
  2. Vijay Wadettiwar : 'कंपन्यांचे खिसे भरणाऱ्या सरकारला युवकांनी घडवली अद्दल'
  3. Thackeray Group Demand: कंत्राटी भरतीमुळे तरूणांचं भवितव्य अंधारात, सरकारनं भूमिका स्पष्ट करावी- ठाकरे गटाची मागणी
Last Updated : Oct 21, 2023, 2:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.