ETV Bharat / state

पुणे-मुंबई महामार्गावर 46 लाखांचा मद्यसाठा जप्त

author img

By

Published : Aug 12, 2021, 5:27 PM IST

राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुणे-मुंबई महामार्गावरून तब्बल 45 लाख रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला आहे. यात एकूण 46 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शिवाय, टेम्पो चालकालाही अटक करण्यात आली आहे.

pune
pune

पुणे - राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुणे-मुंबई महामार्गावरून तब्बल 45 लाख रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला आहे. यामध्ये मद्याची अवैधरित्या वाहतूक केली जाणार होती. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. एकनाथ बाबली लोके (वय 25 वर्षे, तळवडे, सावंतवाडी, सिंधुदुर्ग) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

सापळा रचून पकडला टेम्पो

या प्रकरणी अधिक माहिती अशी, की राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांना जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून अवैधरित्या मद्याची वाहतूक होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुणे मुंबई महामार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी सापळे रचले. त्यानंतर गुरुवारी दुपारच्या सुमारास मावळ तालुक्यातील हॉटेल बगीचा समोर संशयास्पद रित्या धावणाऱ्या आयशर टेम्पोला सीमाशुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांनी थांबवले.

एकूण 46 लाखांचा मुद्देमाल जप्त

या टेम्पोची तपासणी केली असता यामध्ये सुमारे 450 बॉक्स सापडले. या बॉक्समध्ये तब्बल 5400 मद्याच्या बाटल्या होत्या. यानंतर टेम्पो आणि मद्यसाठा असा एकूण 46 लाख रुपयांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला आहे. या मद्याची वाहतूक करणाऱ्या चालकालाही अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात मुंबई दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65 (अ) (ई) 81, 83, 90 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास दुय्यम निरीक्षक डी बी सुपे करत आहेत.

हेही वाचा - MAHARSHTRA BREAKING : गोवा हादरले, कलंगुट समुद्रकिनारी तरुणीचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.