ETV Bharat / state

Dared to ride a bullock cart : 16वर्षाच्या दीक्षाची कमाल; उसळणाऱ्या बैलाला क्षणात थोपवले

author img

By

Published : Mar 20, 2022, 12:50 PM IST

बैलगाडा घाटात बैल जुंपण्याचा धाडसी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अवघ्या सोळाव्या वर्षी दीक्षा पारवे हीन बैलाला थोपवत घाटातील बैलगाडा प्रेमींची थाप मिळवली आहे. ( Diksha dared to ride a bullock cart )

16 Years old girl Diksha dared to ride a bullock cart in Pimpri Chichwad
16वर्षाच्या दीक्षाची कमाल

पिंपरी-चिंचवड - बैलगाडा घाटात बैल जुंपण्याचा धाडसी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अवघ्या सोळाव्या वर्षी दीक्षा पारवे हीन बैलाला थोपवत घाटातील बैलगाडा प्रेमींची थाप मिळवली आहे. ( Diksha dared to ride a bullock cart ) दीक्षा ही जुन्नर तालुक्यातील असून तिच्या घरी एकूण सात बहिणी आहेत. तिघींना बैलगाडा शर्यतीचा नाद लागला असून त्या तिघी जणी बैल जुंपण्यासह त्यांची निगा राखतात. ( Bullock cart race ) प्रत्येक बैलगाडा घाटात त्या उतरण्यास सज्ज असतात.

प्रतिक्रिया

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल -

उंचखडक घाटात शर्यतीसाठी बैलगाडा जुंपत असताना उसळी मारलेल्या बैलाला म्हणजेच विज्याला थोपवण्याचं काम दीक्षांन केलं. यानंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला. भल्या भल्या तरुणांना बैल आवरण कठीण जाते. मात्र, तिने वाघिणीचे काळीज दाखवून धाडस केले. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या वाऱ्यासारखं पसरत आहे.

हेही वाचा - World Oral Health Day : तोंडाची स्वच्छता कशी ठेवणार? वाचा ईटीव्ही भारत'चा खास रिपोर्ट

तिसऱ्या पिढीत मुली गाजवतायत घाट -

दीक्षा ही बैलगाडा शर्यतीच नाही तर घोडसवारी देखील करते. दिक्षाच्या घरी एकूण सात बहिणी असून पैकी तिघी जणींनी बैलगाडा शर्यतीचा छंद जोपासलाय. विज्याच्या जोडीला बुलेट नावाचा बैल असून त्याची निगा प्रियांका आणि दिव्या या राखतात. दिक्षाला दोघी बहिणी मदत करतात. पारवे कुटुंब हे दोन पिढ्यांपासून बैलगाडा शर्यत गाजवत आहेत. तिसऱ्या पिढीत मात्र मुलीच पुढे येऊन बैलगाडा शर्यती घाट गाजवत आहेत. बैल थोपवने हे लहानसहान काम नाही. त्याला जीवाची बाजी लावावी लागते. त्यामुळं दिक्षाच करावं तेवढं कौतुक नक्कीच कमी आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.