15 हजार फूट उंच हिमशिखरावर शिवजयंती! परभणीच्या गिर्यारोहकांचे अनोखे अभिवादन

author img

By

Published : Feb 22, 2022, 10:20 PM IST

Parbhani mountaineer Shiv Jayanti celebration

परभणीसह देशभरातील काही गिर्यारोहकांनी उत्तराखंडमधील तब्बल 15 हजार फूट उंच हिमशिखरावर शिवजयंती साजरी केली. शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत त्यांना अभिवादन केले. यानिमित्त हिमशिखरावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष दुमदुमला.

परभणी - परभणीसह देशभरातील काही गिर्यारोहकांनी उत्तराखंडमधील तब्बल 15 हजार फूट उंच हिमशिखरावर शिवजयंती साजरी केली. शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत त्यांना अभिवादन केले. यानिमित्त हिमशिखरावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष दुमदुमला.

हिमशिखरावरी शिव जयंती साजरी करताना गिर्यारोहक

हेही वाचा - Shiv Jayanti 2022 : पाथरीत 10 हजार 392 स्क्वेअर फुटांची रांगोळी प्रतिमा साकारुन शिवरायांना अभिवादन

शिवजयंतीदिनी शिखरावर पोहोचण्याची होती योजना -

उत्तराखंडमधील पांगरचुला व तुंगनाथ या दोन हिमपर्वतावर भारतातील विविध राज्यातून एकत्र आलेल्या तरुण शिवप्रेमी गिर्यारोहकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त शिवघोषणा देत अभिवादन केले. या दोन्ही शिखरावर उत्साहात शिवजयंती साजरी केली. दिल्ली येथील तरुण राहूल शर्मा या गिर्यारोहकाने उत्तराखंडमधील पांगरचूला व तुंगनाथ येथे या हिवाळी मोहिमेची योजना आखली होती. हैद्राबादचा हर्षादित्य बिजापुरी व परभणीचे रणजित कारेगांवकरयांनी चर्चेतून ठरवले की, या मोहिमेत 19 फेब्रुवारी रोजी पांगरचुला व तुंगनाथ या हिमपर्वतावर शिवजयंती साजरी करायची. त्याप्रमाणे 18 फेब्रुवारी रोजी तुगासी या गावातून गिर्यारोहणास सुरूवात झाली होती.

उने 15 अंश तापमानात मोहीम -

सर्व गिर्यारोहकांनी 18 फ्रेब्रुवारी रोजी सायंकाळी खुलारा येथे उने 15 अंश तापमानात हिमपर्वतावरील बेसकॅम्पवर मुक्काम केला. त्यानंतर 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता सर्व गिर्यारोहक खुलाराहून पांगरचुला हिमपर्वत सर करण्यास रवाना झाले. सकाळी 10 वाजता शिखरावर जाऊन भारतीय व शिवप्रतिमा असलेले भगवे ध्वज फडकवून, 'भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय', चा जयघोष करत सर्वांनी शिवरायांना अभिवादन केले.

'या' गिर्यारोहकांचा समावेश -

तेलगू भाषिक हर्षादीत्य बिजापुरी यांनी शिवस्तुतीपर मराठी घोषणा गाऊन एक वेगळा रोमांच निर्माण केला. दुसऱ्या दिवशी 20 फेब्रुवारी रोजी जगातील सर्वांत उंच शिवमंदीर असलेल्या तुंगनाथ येथेही गिर्यारोहन करून शिवघोषणा देत या गिर्यारोहकांनी शिवजयंती साजरी केली. या मोहिमेत परभणीतील सहाय्यक निबंधक माधव यादव, रणजित कारेगांवकर, विष्णू मेहेत्रे, प्रदीप धर्मशेट्टी, राजस्थान येथील संदीप सैनी, उत्तराखंड गढवाल येथील रोहीत शर्मा, दिल्ली येथील राहूल शर्मा, विष्णू सिंग, उत्तराखंड काशीपुरची काजल गुप्ता, तेलंगनाचे हर्षादीत्य बिजापुरी, डाॅ.श्रीकांत, डाॅ.उदयकुमार, स्थानिक गाईड सुनिल सिंग आदी तरुण गिर्यारोहकांनी सहभाग नोंदवत शिवजयंती उत्साहात साजरी केली.

हेही वाचा - Accident in Parbhani : रिक्षा पलटी झाला अन् मायलेकरांचा जीव गेला; खड्ड्यांमुळे 8 दिवसात 5 बळी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.