परभणी : सामूहिक बलात्कारानंतर विष प्रशन करणाऱ्या तरुणीचा अखेर मृत्यू

author img

By

Published : Sep 20, 2021, 10:30 PM IST

parbhani gang rape

सोनपेठ तालुक्यातील डिघोळ येथे एका महाविद्यालयीन युवतीवर सामूहिक बलात्कार झाला होता. त्यानंतर तिने विष प्राशन केले होते. मात्र, 6 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या त्या युवतीच्या मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना आज सोमवारी संध्याकाळी घडली.

परभणी - सोनपेठ तालुक्यातील डिघोळ येथे एका महाविद्यालयीन युवतीवर सामूहिक बलात्कार झाला होता. त्यानंतर तिने विष प्राशन केले होते. मात्र, 6 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या त्या युवतीच्या मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना आज सोमवारी संध्याकाळी घडली. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपी ताब्यात घेतले असून तिसरा फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पडक्या शाळेत बोलवून आळीपाळीने केला बलात्कार -

सोनपेठ तालुक्यातील डिघोळ येथे राहणाऱ्या महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणीस डिघोळ येथील तिघांनी १२ सप्टेंबर रोजी दुपारी एक ते पाच वाजेच्या सुमारास आरोपींनी फोन करुन पडक्या शाळेत बोलवून आळीपाळीने बलात्कार केला. यामुळे पीडित मुलीने १४ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास विषारी औषध प्राशन केले होते. त्यामुळे तिला अधिक उपचारासाठी आंबाजोगाई येथे दाखल केले असता, तिची प्रकृती गंभीर झाल्याने तिला पुढील उपचारासाठी लातूर येथे हलविण्यात आले होते.

हे ही वाचा - अखेर राज कुंद्राला जामीन मंजूर, अडीच महिन्यानंतर घेणार मोकळा श्वास

बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल -

दरम्यान, या प्रकरणी आज सोमवारी पीडितेच्या नातेवाईकांनी सोनपेठ पोलीसात तक्रार दाखल केली. त्यावरुन सोनपेठ पोलिसांनी तीन आरोपी विरुद्ध ३७६ ड ३५४ ड (३४) तसेच बालकांचा लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपअधीक्षक श्रेणिक लोढा, पोलीस निरीक्षक प्रदिप काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास भिकाणे हे तपास करत आहेत.

हे ही वाचा - बाप्पाला निरोप दिल्यानंतर ट्रोलर्सच्या निशाण्यावर शाहरुख खान

सहा दिवसांची मृत्यूची झुंज संपली -

या प्रकरणी दोन अल्पवयीन आरोपींना तातडीने ताब्यात घेतले असून, तिसऱ्या आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र, या दरम्यान पीडितेचा दुर्देवी अंत झाला. सदरील घटनेतील पीडितेने विषारी औषध प्राशन केले होते. मात्र, सहा दिवस चाललेली तिची मृत्यूशी झुंज अखेर संपली असून आज सोमवारी (२० सप्टेंबर) सायंकाळच्या सुमारास पीडितेचा दुर्दैवी अंत झाला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.