ETV Bharat / state

Grampanchayat Election 2022 : पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायतच्या निवडणुकीत मतदार बजावणार आपला हक्क

author img

By

Published : Oct 14, 2022, 2:58 PM IST

पालघर जिल्ह्यातील 342 ग्रामपंचायतीच्या निवडणुका ( Gram Panchayat Elections ) 16 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत 7 लाख 89 हजार 165 मतदार आपला हक्क बजावणार ( Voters will exercise their right ) आहे. जिल्ह्यात 1257 प्रभागातून 331 सरपंच व 3121 सदस्य निवडले जाणार आहेत.

Grampanchayat election 2022
पालघर

पालघर : पालघर जिल्ह्यातील 342 ग्रामपंचायतीच्या निवडणुका 16 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत 7 लाख 89 हजार 165 मतदार आपला हक्क बजावणार आहे. जिल्ह्यात 1257 प्रभागातून 331 सरपंच व 3121 सदस्य निवडले जाणार आहेत. यासाठी जिल्ह्यात 171 झोनमध्ये 1332 मतदान केंद्र असतील, या मतदान केंद्रासाठी दहा टक्के राखीव धरून 171 झोनल अधिकारी, 1332 केंद्राध्यक्ष, क्रमांक एक ते तीन चे 4482 मतदान अधिकारी, व इतर 1494 कर्मचारी असा निवडणूक कर्मचारी वर्गाची व्यवस्था ( Arrangement of Election Staff ) करण्यात आली आहे. मतपेटी तसेच निवडणूकीसाठी 166 एसटी बस सह 73 मिनी बसेस, 242 खाजगी जीप्स, मिळून 481 वाहनांची सोय करण्यात आली आहे याव्यतिरिक्त पालघर तालुक्यातील वाढीव वैतरणा मतदान केंद्रावर जाण्यासाठी बोटीचा वापर ( Use of boat to go to Vaitrana Polling Station ) करण्यात येणार आहे.



मतमोजणी केंद्र : डहाणू तालुक्यातील मतमोजणी सेंट मेरी हायस्कूल मसोली डहाणू येथे, तर वाडा तालुक्यातील मतमोजणी पी. जे. हायस्कूल सभागृह वाडा, विक्रमगड तालुक्यातील मतमोजणी पंचायत समिती सभागृह विक्रमगड, जव्हार तालुक्यातील मतमोजणी औद्योगिक प्रशिक्षण संस्था जव्हार, व पालघर, वसई, तलासरी, वाडा, तालुक्यातील मतमोजणी त्या त्या तहसीलदार कार्यालयात होणार आहे. याच ठिकाणाहून मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे 15 ऑक्टोबर रोजी मतपेटी तसेच आवश्यक साहित्याचे वाटप होणार आहे.

पोलीस प्रशासन सज्ज : ग्रामपंचायतीच्या या निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडू नयेत याकरिता पोलिस अधीक्षक पालघर यांनी 337 मतदान केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवला आहे. निवडणूक सोयस्करित्या पार पडावी याकरिता चार पोलीस उपअधीक्षक, दहा पोलीस निरीक्षक , 107 सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक , 1 हजार 982 अंमलदार, 450 होमगार्ड,आणि दोन राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात ठेवण्यात आल्या आहेत. संपूर्ण निवडणूक शांततेने पार पाडावी, यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील राहणार आहे. दरम्यान, सर्व हद्दीमध्ये पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गावाच्या संवेदनशीलतेनुसार व तिथल्या राजकीय परिस्थितीनुसार बंदोबस्ताची विभागणी करण्यात आली आहे. खुल्या वातावरणात निवडणुका पार पाडण्याचा आमचा प्रयत्न असणार असल्याचे पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.