ETV Bharat / state

Palsai Gram Panchayat : बाळाच्या नावापुढे आईचे नाव लावण्याचा पहिला ठराव पारित

author img

By

Published : Jul 1, 2022, 5:29 PM IST

The first resolution to put the mother's name next to the baby's name was passed in Palasai Gram Panchayat
बाळाच्या नावापुढे आईचे नाव लावण्याचा पहिला ठराव पालसई ग्रामपंचायतीत पारित

वाडा तालुक्यातील पालसई ग्रामपंचायत ( Palsai Gram Panchayat ) येथील ग्रामसभा दि . ३१/०५/२०२२ ठराव क्र . ५ ( ३ ) अन्वये आजच्या युगात स्त्री पुरुष समानता, ( Gender equality ) तसेच सन २०२२ हे वर्ष भारतीय स्वातंत्र्याचे अमृत वर्ष साजरे करत आहेत . ह्या वर्षामध्ये भारतातल्या प्रत्येक मातेला तिचा समानतेचा अधिकार ( right to equality ) मिळायला हवा. बाळाच्या नावाच्या पुढे वडिलांसोबत मातेचे नाव सुद्धा बाळाच्या जन्म दाखल्या मध्ये समाविष्ट करण्या संदर्भात पालसई ग्रामसभेने ठराव पारित केला आहे.

पालघर- मुलांच्या जन्माच्या 9 महिन्यापासून ते पालन पोषण, शिक्षण जडणघडण इत्यादीत सर्वात मोलाचे योगदान, त्याग हा आईचा. आईचे नाव सगळीकडे आपल्या नावासमोर का नको? हाच प्रश्न घेऊन आता श्रमजीवी संघटनेने विशेष मोहीम सुरू करत राज्यभर संघटनेचे कार्यक्षेत्र असलेल्या भागात जनजागृती सुरू केली आहे. आईच्या नावाचा उल्लेख असावा असा विचार सर्वप्रथम श्रमजीवी संस्थापिका विद्युल्लता पंडित यांनी मांडला. 2 जुलै या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या विशेष मोहिमेसाठी राखीव ठेवत श्रमजीवी संघटनेने याबाबत ग्रामपंचायतींचे ठराव घेण्याची मागणी केली.

जिल्हाधिकाऱ्यांना पत्र - श्रमजीवीच्या आवाहनाला मागणीला प्रतिसाद देत राज्यातील पहिलाच ठराव हा आज पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील पालसई या ग्रामपंचायतीने ( Palsai Gram Panchayat ) घेतला आहे. तसे पत्र त्यांनी जिल्हाधिकारी पालघर यांना दिले आहे. पालघर जिल्ह्यातील पालसई ग्रामपंचायतीने केलेला हा ठराव या मोहिमेचा मैलाचा दगड मानला जाणार आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी हा सुविचार आपण लहानपणापासून ऐकतो आहोत. आईशिवाय कोणाचेही आयुष्य हे अंधारमयच आहे. हे जरी, सत्य असले तरी आपल्या नावापुढे मात्र फक्त वडिलांचेच नाव लावण्याची प्रथा पडली आहे.

आईचेही नाव लावण्यासाठी जनजागृती - गेली अनेक वर्षे श्रमजीवी संघटनेच्या संस्थापिका विद्युल्लता पंडित यांनी याबाबत नेहमीच आग्रही भूमिका घेत नावासमोर वडिलांसोबत आईचेही नाव लावण्यासाठी जनजागृती केली. किंबहुना संघटनेच्या कुटुंबात हे अंगवळणी पडले देखील मात्र, समाजात अजूनही नावापुढे आईचे नाव जाणीवपूर्वक लावण्यासाठी सगळेच पुढे येतात असे दिसत नाही. याबाबत श्रमजीवी संघटनेच्या कार्याध्यक्षा स्नेहा दुबे-पंडित यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. विद्युल्लता पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त जुलै महिन्यात सर्वच ग्रामपंचायतींच्या ग्रामस्थांची जनजागृती करून तसे ठराव करून घेण्याचे काम श्रमजीवी ने हाती घेतले आहे.



महिला सबलीकरण - वाडा तालुक्यातील ग्रामपंचायत पालसई येथील ग्रामसभा दि . ३१/०५/२०२२ ठराव क्र . ५ ( ३ ) अन्वये आजच्या युगात स्त्री पुरुष समानता, तसेच सन २०२२ हे वर्ष भारतीय स्वातंत्र्याचे अमृत वर्ष ( nectar year Indian independence ) साजरे करत आहेत . ह्या वर्षामध्ये भारतातल्या प्रत्येक मातेला तिचा समानतेचा अधिकार मिळायला हवा. बाळाच्या नावाच्या पुढे वडिलांसोबत मातेचे नाव सुद्धा बाळाच्या जन्म दाखल्या मध्ये समाविष्ट करण्या संदर्भात पालसई ग्रामसभेने ठराव पारित केला आहे.



आईच्या सन्मानार्थ ही मागणी - आईच्या सन्मानार्थ पालसई ग्रामस्थांनी घेतलेला पुढाकार ऐतिहासिक नोंद म्हणून राहील असे मत ऍड स्नेहा दुबे-पंडित यांनी व्यक्त केले आहे. राज्यातील सर्वच ग्रामस्थांना प्रत्येकाने आपल्या आईच्या सन्मानार्थ ही मागणी सरकारकडे लावून धरावी असे आवाहन त्यांनी केले.

The first resolution to put the mother's name next to the baby's name was passed in Palasai Gram Panchayat
बाळाच्या नावापुढे आईचे नाव लावण्याचा पहिला ठराव पालसई ग्रामपंचायतीत पारित



हेही वाचा - CM ON Viral Video - आमदारांच्या व्हायरल व्हिडिओवर आमदारांची नाराजी

हेही वाचा - Palkhi Ringan Sohala : वैष्णवांच्या दाटीत दौडले अश्व... चांदोबाचा लिंबमध्ये पार पडले डोळ्याचे पारणे फेडणारे पहिले उभे रिंगण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.