ETV Bharat / state

'वाडा तालुक्याचा आमदार' ही बिरुदावली विधानसभा निवडणुकीतून बाद

author img

By

Published : Oct 26, 2019, 11:10 AM IST

Updated : Oct 26, 2019, 12:01 PM IST

वाडा तालुक्याला मिळालेले आमदार हे आता विक्रमगड, शहापूर, भिवंडी या मतदारसंघातील आहेत. यामुळे 30 वर्षांपासून वाडा तालुक्याचा आमदार, अशी असलेली बिरुदावली या निवडणुकीनंतर बाद झाली आहे.

पालघर जिल्ह्यातील मतदारसंघाचे निकाल

पालघर - जिल्ह्यातील वाडा तालुक्याला तीन मतदारसंघात विभागले गेले आहे. 69 मतदान केंद्र भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात तर 44 मतदान केंद्र विक्रमगड विधानसभा मतदारसंघात जोडली आहेत, तर 49 मतदान केंद्र ही शहापूर विधानसभा मतदारसंघाशी जोडले आहेत. यामुळे 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर आलेल्या निकालातून शिवसेना, भाजप यांच्या वर्चस्वाला जसा धक्का लागला आहे, तसेच 'वाडा तालुक्याचा आमदार' ही बिरुदावलीही या निवडणुकीअंती संपुष्टात आली आहे.

वाडा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची जोरदार मुसंडी

हेही वाचा.... कैद्यांनी तयार केलेल्या पणत्यांनी यंदाची दिवाळी तेजोमय होणार

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड विधानसभा मतदारसंघातील निकाल भाजपसाठी धक्का देणारा ठरला, तर शहापूर विधानसभा मतदारसंघाचा निकाल हा शिवसेनेसाठी धक्कादायक ठरला. या दोन्ही ठिकाणी महाआघाडीच्या उमेदवारांनी मारलेली बाजी सध्या मतदारसंघात चर्चेचा विषय ठरत आहे. भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मात्र शिवसेनाच्या उमेदवाराविरोधात पोषक वातावरण तयार करण्यात महाआघाडी कमी पडली, यामुळे या जागेवर पुन्हा शिवसेनेचाच विद्यमान आमदार विजयी झाला. त्यामुळे वाडा तालुक्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आणि शिवसेनेचा एक आमदार लाभला आहे.

हेही वाचा.... विजयाच्या जल्लोषात न रमता आमदार धावले शेतकऱ्यांच्या मदतीला

माजी मंत्री विष्णू सावरा हे आमदार म्हणून वाडा विधानसभा मतदारसंघातून निवडून येत होते. या विधानसभा निवडणुकीत वाडा तालुक्यातील जवळपास 30 वर्षांपासून सावरा यांचे असलेले प्रतिनिधित्व कमी झाले. वाडा तालुका हा राजकारणात अग्रेसर असायचा.

हेही वाचा.... 'आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी देणार पाठींबा'

शहापूर विधानसभा मतदारसंघात ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेबाबत घेतलेले निर्णय आणि उमेदवारी याबाबत काही शिवसैनिक नाराज होते. शहापूरातील शिवसैनिकांनी याला विरोधही केला होता. या मतदारसंघात सेनेची ताकद असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या दौलत दरोडांनी पांडूरंग बरोरांच्या मतावर दरोडा टाकून मोठा मताधिक्याने निवडून आले आहेत.

हेही वाचा.... क्यार चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला धोका, अतिवृष्टीचाही इशारा

विक्रमगड विधानसभा मतदारसंघात महायुतीचे भाजपचे उमेदवार हेमंत सावरा यांचाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनिल भुसारा यांनी पराभव केला. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे फारसे राजकीय प्राबल्य नव्हते. मात्र, महाआघाडीतील कम्युनिस्ट पक्ष आणि बविआच्या मतांची जादू चालल्याचे येथे सांगितले जाते. त्यातच मतदारसंघात विकासकामे झाली नाहीत, हा प्रमुख मुद्दा प्रचारात राबवून महाआघाडीने प्रचार केला. तसेच मतदारसंघातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या, सेना भाजपच्या ताब्यात असतानाही हा पराभव झाला आहे, यामुळे महायुतीच्या घटकपक्षाच्या कामगिरीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहेत.

हेही वाचा.... अजित पवारांसह विश्वजीत कदमांचे मताधिक्य पाहून व्हाल थक्क...राज्यातील ५ विक्रमी विजयवीर

भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार शांताराम मोरे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माधवी म्हात्रे उमेदवार होत्या. या मतदारसंघात वाडा-भिवंडी महामार्गावरील खड्डेमय रस्ता, पाणी, रस्ते या समस्या तसेच रोजगाराच्याही समस्या आहेत. असे असतानाही महाआघाडीकडून यावर काही प्रचार करता आला नाही. तसेच बहुतेक कार्यकर्त्यांनी विक्रमगड आणि शहापूर विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केल्यामुळे येथे पुन्हा एकदा शिवसेनेचे शांताराम मोरे यांनी जोरदार मुसंडी मारली.

Intro:वाडा तालुक्याचा आमदाराची बिरुदावली या निवडणुकीत बाद झाली


विक्रमगड,शहापूर विधानसभा निवडणुकीतील महायुतीला अनपेक्षित धक्के


शिवसेनेचे पुन्हा भिवंडी ग्रामीणवर वर्चस्व 


पालघर (वाडा) संतोष पाटील 

विधानसभा निवडणुकीचा निकाल हा पालघर जिल्ह्य़ातील विक्रमगड विधानसभा मतदारसंघात भाजपसाठी अनपेक्षित धक्का देणारा ठरला तर शिवसेनेसाठी शहापूर विधानसभा मतदारसंघाचा निकाल हा शिवसेनेसाठी धक्कादायक ठरला या दोन्ही ठिकाणी महायुतीच्या विक्रमगड विधानसभा मतदारसंघात भाजपला तर शहापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करून येथे महाआघाडीच्या उमेदवाराने मारलेली मजल चर्चेचा विषय मतदारसंघात ठरला आहे.आणि इतर विधानसभा मतदारसंघातील प्रचाराप्रमाणे भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या शिवसेना उमेदवारा विरोधात पोषक वातावरण तयार करण्यात व  त्याचा फायदा घेण्यात  महाआघाडी कमी पडली तसेच नियोजन,कार्यकर्त्यांचे जाळे याही बाबींवर लक्ष केंद्रित नाही त्यामुळे या जागेवर महाआघाडी कमी पडली आणि पुन्हा येथे शिवसेनेच्या विद्यमान आमदाराचा विजय झाला.ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले.त्यामुळे वाडा तालुक्याला दोन राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि एक सेनेचा आमदार लाभला आहे.

पालघर जिल्ह्य़ातील वाडा तालुक्याला तीन मतदारसंघात विभागले गेले आहे. 69 मतदानकेंद्र भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात तर 44 मतदानकेंद्र विक्रमगड विधानसभा मतदारसंघात जोडली आहेत.आणि 49 मतदानकेंद्र ही शहापूर विधानसभा मतदारसंघाशी जोडले आहेत.

या तिन्ही मतदारसंघात शिवसेना,भाजप,राष्ट्रवादी काँग्रेस असे संमिश्र लोकप्रतिनीधीत्व  सन 2014 च्या विधानसभा निवडणूकीत मिळाले होते.या विधानसभा निवडणूकीत शिवसेनेने पुन्हा भिवंडी ग्रामीण विधानसभेचे लोकप्रतिनीधीत्व मिळवून भाजपचे इथले सातत्याने वाडा तालुक्यातील आणि वाड्याचा आमदार म्हणून जवळपास  30 वर्ष विष्णू सवरा यांचे लोकप्रतिनीधीत्व आजघडीला येथून कमी झाले.आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्थापणेनंतर पहील्यांदा आमदार राष्ट्रवादी काँग्रेसला विक्रमगड विधानसभा मतदारसंघात महायुतीचे भाजप उमेदवार हेमंत सवरा 


यांचा पराभव राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनिल भुसारा यांनी ते लोकप्रतिनीधीत्व मिळविले आहे.


पुर्वी माजी मंत्री विष्णू सवरा हे आमदार म्हणून वाडा विधानसभा मतदारसंघ,भिवंडी ग्रामीण विधानसभा, आणि विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून निवडून येत होते.वाडा तालुका हे राजकारणात अग्रेसर असायचा.यापुढे वाडा तालुक्यातील आमदार होणे कठीण होणार आहे.कारण तालुक्याला विभाजीत केल्याने इतर मतदारसंघातील तालुके हे आता वाडा तालुक्याच्या उमेदवाराला स्वीकारत नाहीत हे या निवडणुकीतून दिसुन आले आहे.आणि ते अधोरेखित झाले आहे. या अगोदर ही लोकप्रतिनीधीत्व तीन आमदार दोन खासदार लाभले असले तरी इथल्या सर्वांगीण विकासाच्या नावाने बोंबाबोंब आहे.यापुढे वाड्यातील आमदार होणे आणि इथला विकास होणे यापुढे कठीण बनणार असल्याचे राजकीय तज्ञांकडून

सांगितले जाते.

या विधानसभा निवडणूकीत शहापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस कडून शिवसेनेत दाखल झालेल्या पांडूरंग बरोबर यांना पहीला विरोध वाडा तालुक्यातील काही शिवसैनिकांनी विरोध केला .हा जरी शमला आणि नाराजी दूर झाल्याचे शिवसेनेचे उमेदवार पांडुरंग बरोरा जरी सांगत असले तरी नाराजीचा सूर शेवट पर्यंत दिसुन येत .बरोंरांचे समर्थकही हे खाजगीत बोलत होते.ते उघडपणे बोलले तर नाराज अजून नाराज होतील म्हणून आहे ते समजून नियोजनाचा व्यवहार त्यांनीच वाड्यात ठेवल्याचे सांगितले जातेय.राष्ट्रवादी काँग्रेसनेही जास्त गाजावाजा प्रचार केला.बरोरा यांनी सेनेत प्रवेश केल्यानंतर लागलीच अजित पवारांनी शहापूरातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली.


शहापूर विधानसभा मतदारसंघात ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे  यांनी शिवसेनेबाबत घेतलेले निर्णय आणि उमेदवारी यात काही शिवसैनिकांना रुचले नाहीत.या निर्णयाविरोधात शहापूरातील शिवसैनिकांनी त्यांना विरोधही केला होता.आपल्या निर्णयाने नाराज शिवसैनिक वागतील असा शिंदेचा समज होता.पण या मतदारसंघात सेनेची ताकद असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या दौलत दरोडांनी पांडूरंग बरोरांच्या मतावर दरोडा टाकून मोठा मताधिक्याने निवडून आले आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत सेना उमेदवार  दौलत दरोडा यांच्या विरोधात पांडूरंग बरोंरा हे 5 हजारांहून अधिक मताधिक्य मिळवून ते राष्ट्रवादीकडून निवडून आले होते.


तर विक्रमगड विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या भाजपचे उमेदवार हेमंत सवरा यांनाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनिल भुसारा यांच्या पराभव केला.


या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे फारसे राजकीय प्राबल्य नव्हते.माञ महाआघाडीतील कम्युनिस्ट पक्ष आणि बविआच्या मतांची जादू चालल्याचे सांगितले जाते.यातच मतदारसंघात विकासकामे केली नाहीत.या प्रमुख अजेंडा प्रचारात राबवून महाआघाडीने प्रचार केला.मोखाड्यातील स्थानिक म्हणून मीच स्थानिक उमेदवार आहे.हे सोशल मीडियावरचा इतर माध्यमातून केलेला प्रचार हा जव्हार,मोखाडा,विक्रमगड भागातील घेतलेली मतांची आघाडी आणि उमेदवारीवरून नाराज असलेल्या भाजपच्या गडातील मतदारसख्या ही बरेच काही सांगून जात होती.  सत्तेत आमदार विष्णू सवरा मंञी असताना मंञी सवरां भोवती  बहूतेक कार्यक्रमात हजेरी   लावणा-यांची आणि विकास कामांसाठी निधीसाठी धडपड करणाऱ्यांची भुमिका निवडणूकीत काळात काय भुमिका होती? यावर त्यांच्या मुलाच्या जय पराजयाचा अर्थ लागेल.अशी चर्चा ही मतदारसंघात खाजगीत केली जातेय.मतदारसंघात जिल्हा परिषदा,पंचायत समित्या,सेना भाजपच्या ताब्यात असतानाही हा पराभव होतो.ते यामुळे महायुतीच्या घटकपक्षाच्या कामगिरीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जातात.यावर चर्चेचे गुऱ्हाळ नाक्यावर, चौकात खाजगीत रंगताहेत.

त्याच प्रमाणे भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार शांताराम मोरे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माधवी म्हात्रे होत्या.या मतदारसंघात वाडा-भिवंडी महामार्गावरील खड्डेमय रस्ता,पाणी,रस्ते समस्या,रोजगार समस्या अशा विवीध समस्या असतानाही त्यावर महाआघाडी कडून प्रभाव काही प्रभाव टाकता आला नाही.तसे तर या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे जाळे नाही.आणि यातील बहूतेक कार्यकर्त्यांनी विक्रमगड आणि शहापूर विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले असल्यामुळे नियोजनाचा अभाव निर्माण झाल्याचे बोलले जाते.


त्यामुळे निर्विवाद पुन्हा एकदा शिवसेनेच्या आमदार शांताराम मोरे यांनी जोरदार मुसंडी मारल्याचे सांगितले जात आहे. 

वाडा तालुक्याला मिळाले लोकप्रतिनिधी आमदार हे तिन्ही मतदारसंघातील मोखाडा, शहापूर,भिवंडी भागातील आहेत.

30 वर्ष वाडा तालुक्याचा आमदार म्हणून बिरुदावली असणारा वाडा तालुका या निवडणुकीने बाद झाला आहे.


Body:visual vikramgad constituency after result


Conclusion:ok
Last Updated : Oct 26, 2019, 12:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.