ETV Bharat / state

उस्मानाबाद : बेंबळी जिल्हा परिषद शाळेतील कामचुकार मुख्याध्यापक निलंबित

author img

By

Published : Jul 30, 2020, 5:36 PM IST

bebli zp school
bebli zp school

बेंबळी जिल्हात परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक ए.ए. खतीब यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यांची क्वारंटाईन सेंटरमध्ये नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी कोणतीही पूर्वकल्पना वरीष्ठांना न देता दांडी मारली व क्वारंटाईन सेंटर बंद ठेवले. यामुळे ही कारवाई झाली आहे.

उस्मानाबाद- बेंबळी येथील जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक ए. ए. खतीब यांची कोरोना कक्षामध्ये नेमणूक करण्यात आली होती. मात्र, ते सतत कामचुकारपणा करत गैरहजर राहत होते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.

राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती कायदा लागू करण्यात आला असून संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने अति महत्त्वाचे कामकाज सुरू आहे. कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून क्वारंटाईन सेंटर सुरू करण्यात आले आहेत. याची जबाबदारी मुख्याध्यापक ए. ए. खतीब यांना देण्यात आली होती. मात्र, मुख्याध्यापक खतीब यांनी कुठलीही पूर्वकल्पना न देता हे क्वारंटाईन सेंटर बंद ठेवत दांडी मारली.

या प्रकरणी गावातील नागरिक श्यामसुंदर पाटील, नितीन खापरे, किरण चव्हाण, विशाल शहा यांनी तहसीलदारांकडे तक्रार केली होती. त्यानंतर या प्रकरणी शिक्षण विभागाने चौकशी केल्यानंतर मुख्याध्यापक खतीब यांच्याकडे खुलासा मागविण्यात आला होता. मात्र, खातीब यांचा खुलासा असमाधानकारक असल्याने मुख्याध्यापक खतीब यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.