ETV Bharat / state

तुळजाभवानी मंदिरात घटस्थापना करून नवरात्र उत्सवास सुरुवात

author img

By

Published : Sep 29, 2019, 4:43 PM IST

Updated : Sep 29, 2019, 5:38 PM IST

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी

शारदीय नवरात्र उत्सवाला आजपासून देशभरात जल्लोषाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या नवरात्र महोत्सवाला देखील आजपासून सुरुवात झाली आहे. गेल्या सात दिवसांपासून तुळजाभवानी निद्रावस्थेत होती.

उस्मानाबाद - महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या नवरात्र महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. गेल्या सात दिवसांपासून तुळजाभवानी निद्रावस्थेत होती. त्यामुळे आज तुळजाभवानी देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना केली आहे.

तुळजाभवानी मंदिरात घट स्थापना करून नवरात्र उत्सवास सुरुवात झाली आहे.

नवरात्र महोत्सवानिमित्त आज दुपारी विधीवत पूजा करून देवीच्या गाभाऱ्यात घटस्थापना करण्यात आली. या घटामध्ये गहू, ज्वारी, करडई, जवस, हरभरा अशी वेगवेगळ्या प्रकारची पाच धान्य असतात. हे धान्य काळ्या मातीत पेरले जाते. यावरती गोमूत्र टाकले जाते. त्यानंतर या घटाला पाणी घातले जाते व घटाच्या मधोमध खाऊच्या पानांची माळ करून सोडली जाते. अशा पद्धतीने घटस्थापना करून नवरात्रोत्सवाला सुरुवात केली जाते.

हेही वाचा - कोल्हापुरात आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ

यानंतर देवीची वेगवेगळे अलंकार असलेली रूपे नऊ दिवसांत पाहायला मिळतात. या नवरात्र उत्सव काळात महाराष्ट्र राज्यासह इतर राज्यातील भाविक दर्शनासाठी तुळजापूर शहरात दाखल होतात.

हेही वाचा - 'यंदा नवरात्रोत्सवात टॅटूंची चलती, 'कलम ३७०' सह 'चांद्रयान-२' च्या टॅटूंनी वेधलं लक्ष'

Intro:सर पॅकेज करता येईल


तुळजाभवानी मंदिरात घट स्थापना करून नवरात्र उत्सवास सुरवात


उस्मानाबाद- महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या नवरात्र महोत्सवाला आज पासून सुरुवात झाली गेल्या सात दिवसांपासून तुळजाभवानी निद्रा अवस्थेत होती त्यामुळे आज तुळजाभवानी देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना केली या महोत्सवानिमित्त आज दुपारी विधीवत पूजा करून देवीच्या गाभाऱ्यात घटस्थापना केली या घटामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पाच धान्य असतात गहू, ज्वारी, करडी, जवस,हरबरा असतात हे धन्य काळ्या माती पेरले जाते यावरती गोमूत्र टाकले जाते त्यानंतर या घाटाला पाणी घातले जाते व घटकाच्या मधोमध खायचा पानाची माळ करून सोडले जाते अशा पद्धतीने घटस्थापना करून नवरात्रोत्सवाला सुरुवात केली जाते यानंतर देवीचे वेगवेगळे अलंकार असलेले रूप पाहायला मिळतात या नवरात्र उत्सव काळात महाराष्ट्र राज्यासह इतर राज्यातील भाविक दर्शनासाठी तुळजापूर शहरात दाखल होतात


Body:यात vis,byte व ptc आहे


Conclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
Last Updated :Sep 29, 2019, 5:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.