ETV Bharat / state

MLA Kailas Patil : आमदार कैलास पाटील यांचे आमरण उपोषणाला ७ व्या दिवशी तात्पुरती स्थगित

author img

By

Published : Oct 30, 2022, 2:09 PM IST

MLA Kailas Patil
आमदार कैलास पाटील यांचे आमरण उपोषण

आमदार कैलास पाटील यांचे आमरण उपोषण मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृषिमंत्री आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आश्वासनानंतर ७ व्या दिवशी तात्पुरते स्थगित करण्यात ( MLA Kailas Patil hunger strike stop temporarily ) आले. तात्पुरत्या स्वरूपात आमरण उपोषण सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

उस्मानाबाद : उस्मानाबादेत आमदार कैलास पाटील यांचे आमरण उपोषण मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृषिमंत्री आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आश्वासनानंतर ७ व्या दिवशी तात्पुरते स्थगित करण्यात ( MLA Kailas Patil hunger strike stop temporarily ) आले. तात्पुरत्या स्वरूपात आमरण उपोषण सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

आमरण उपोषणाला ७ व्या दिवशी तात्पुरती स्थगित

शेतकऱ्यांच्या हक्काचा पीकविमा : गेल्या सात दिवसापासून सुरू असलेले आमदार कैलास पाटील यांनी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या उपस्थित आमरण उपोषण आज सोडले. शेतकऱ्यांच्या हक्काचा पीकविमा ( Crop insurance ) आणि नुकसान भरपाई मिळावी म्हणून आमदार उपोषणाला बसले होते. उपोषण सुटल्याने शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला.

ओला दुष्काळ जाहीर करावा : उस्मानाबाद शेतकऱ्यांचा पीक विमा व जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा ( Demand to declare wet drought ) या मागणीसाठी आमदार कैलास पाटील यांनी सुरु केलेले आमरण उपोषण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा केली. फडणवीस यांनी सकारात्मक चर्चा करून शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांना न्याय दोण्याचे ठोस आश्वासन दिल्यामुळे ७ व्या दिवशी दानवे यांच्या हस्ते नारळ पाणी पिऊन तात्पुरते आमरण उपोषण स्थगित करण्यात आल्याची घोषणा दानवे यांनी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.