ETV Bharat / state

श्वानही शिकले सोशल डिस्टन्स ठेवायला, आपण कधी शिकणार?

author img

By

Published : Jun 11, 2020, 6:19 PM IST

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येने सव्वाशेचा टप्पा ओलांडला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना नागरिकांना दिल्या आहेत. त्याचे पालन व्यवस्थित होत नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. मात्र, पोलीस दलातील सुलतान, प्लूटो, रॅम्बो आणि कॅप्टन हे चार श्वान या सूचनांचे तंतोतंत पालन करत आहेत.

Dogs
श्वान

उस्मानाबाद - कोरोना विषाणूने देशात आपली पाळेमुळे रोवायला सुरुवात केल्यानंतर आपण स्वच्छता ठेवण्यास सुरुवात केली. मास्क, सॅनिटायझर वापरण्यास सोशल डिस्टन्स ठेवण्यास सुरुवात झाली. मात्र, अद्यापही आपण या नियमांचे काटेकोर पालन करत नसल्याचे निदर्शनास येते. जी सवय माणसांना लागली नाही ती सवय मुक्या प्राण्यांनी आत्मसात केली आहे. सुलतान, प्लूटो, रॅम्बो आणि कॅप्टन हे चार श्वान उस्मानाबादच्या पोलीस दलात तैनात आहेत. हे चौघेही माणसांनाही लाज वाटेल अशा प्रकारे नियमांचे पालन करत आहेत. त्यांच्या तोंडाला मास्क आहे, त्यांचे शरीर सॅनीटाईझ केले जाते आणि ते सोशल डिस्टन्सिंगचेही तंतोतंत पालन करत आहेत.

पोलीस दलातील सुलतान, प्लूटो, रॅम्बो आणि कॅप्टन हे चार श्वान कोरोना संबधित सर्व सुचनांचे पालन करत आहेत

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येने सव्वाशेचा टप्पा ओलांडला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना नागरिकांना दिल्या आहेत. त्याचे पालन व्यवस्थित होत नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. मात्र, पोलीस दलातील सुलतान, प्लूटो, रॅम्बो आणि कॅप्टन हे चार श्वान या सूचनांचे तंतोतंत पालन करत आहेत. त्यांच्या निवासाच्या ठिकाणी वावरताना ते सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेताना दिसतात. चारपैकी प्लूटोने आत्तापर्यंत अनेक पराक्रम गाजवले आहेत. त्याने औरंगाबाद परिक्षेत्रीय कर्तव्य मेळाव्यात सुवर्णपदक मिळवले आहे. आत्तापर्यंत पाच खून, एक रस्ता लूट आणि सहा घरफोड्यांचा छडा त्याने लावला आहे. सहा महिन्यांपूर्वी दलात दाखल झालेल्या रॅम्बोनेही अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत.

कॅप्टन आणि सुलतानचीही कामगिरी वाखण्याजोगी आहे. कोरोना महामारीत कोरोना योद्धा म्हणून हे चौघेजण पुढे आले आहेत. पोलीस मुख्यालयाच्या आवारामध्ये कोणी नवीन व्यक्ति आल्यास प्लूटो तत्काळ सॅनिटायझरची बाटली घेऊन येतो. या चौघा श्वानांसाठी खास मास्कही बनवण्यात आले आहेत. कामकाजाच्या वेळेत हे चौघेजण आवडीने मास्क घालत आहेत. कामाच्या आणि व्यायामाच्या वेळेत हे चौघे परस्परांमध्ये विशिष्ट अंतर कायम ठेवत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.