ETV Bharat / state

सक्तीच्या वीजबिल वसुली विरोधात भाजपचे उस्मानाबादेत चक्काजाम आंदोलन

author img

By

Published : Dec 3, 2021, 9:07 PM IST

भाजपचे उस्मानाबादेत चक्काजाम आंदोलन
भाजपचे उस्मानाबादेत चक्काजाम आंदोलन

कृषी पंपाची वीज पुरवठा खंडित करू ( agitation against light disconnection in Osmanabad ) नये, खंडित केलेल्या शेतकऱ्यांची वीज जोडणी पूर्ववत करावी, या मागणीसाठी आज शहरातील अधीक्षक अभियंता, महावितरण यांच्या कार्यालयासमोर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. उद्धवा अजब तुझे सरकारच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या आहेत. महावितरण कार्यलयासमोर भाजपचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष नितीन काळे ( Osmanabad BJP president Nitin Kale Agitation ) यांनी कीर्तनाच्या माध्यमातून आपले म्हणणे मांडले.

उस्मानाबाद - जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून नोटीस न देता शेतकऱ्यांची कृषी पंपाची वीज तोडण्यात येत आहे. महावितरणच्या या कारभाराविरोधात भाजप आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. उस्मानाबाद येथे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील ( MLA Rana Jagajit Singh Agitation in Osmanabad ) यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आले. मोठ्या प्रमाणात आंदोलक



कृषी पंपाची वीज पुरवठा खंडित करू नये, खंडित केलेल्या शेतकऱ्यांची वीज जोडणी पूर्ववत करावी, या मागणीसाठी आज शहरातील अधीक्षक अभियंता, महावितरण यांच्या कार्यालयासमोर चक्का जाम ( agitation against light disconnection in Osmanabad ) आंदोलन करण्यात आले. उद्धवा अजब तुझे सरकारच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या आहेत. महावितरण कार्यालयासमोर भाजपचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष नितीन काळे ( Osmanabad BJP president Nitin Kale Agitation ) यांनी कीर्तनाच्या माध्यमातून आपले म्हणणे मांडले.

हेही वाचा-अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन : पाहा ग्रंथदिंडीची काही क्षणचित्रे...


भाजप आमदार राणा पाटलांचा राज्य सरकारवर घणाघात

भाजप आमदार राणा पाटील ( MLA Rana Patil slammed over farm subsidy ) यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, की खरीपातील नुकसानीपोटी महाविकास आघाडी सरकारकडून दिलेला शब्द पाळला गेला नाही. एकाही शेतकऱ्याला 10 हजार अनुदान मिळाले नाही. जे तुटपुंजे अनुदान दिले, तेही पूर्ण वितरीत करण्यात आलेले नाही, असे पाटील म्हणाले. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना वेठीस धरून ऐन रब्बी हंगामात वीज तोडणी करण्यात येत आहे. महावितरणच्या माध्यमातून राज्य सरकारने अन्यायकारक वसुली मोहीम सुरू केल्याचा आरोप राणा जगजितसिंह पाटील यांनी केला.

हेही वाचा-ST employee death : निलंबित एसटी कर्मचाऱ्याचा ह्रदयविकाराने मृत्यू; बस स्थानकात मृतदेह ठेवून संघटनेचे धरणे आंदोलन

मंत्रीमंडळाच्या बैठका होवूनही राज्य सरकारचा निर्णय नाही-
भारतीय जनता पक्षाच्यावतीने मुख्यमंत्र्यांना 17 नोव्हेंबर रोजी निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर दोन मंत्रीमंडळाच्या बैठका होवूनही या गंभीर विषयाबाबत कुठलेच सकारत्मक पाउल उचलण्यात आले नाही. याविरोधात हे आंदोलन करण्यात आले, असल्याचे आमदार पाटील म्हणाले. आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य नेताजी पाटील, जिल्हाध्यक्ष नितीन काळे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर आदी आंदोलनात सामील झाले होते.

हेही वाचा-Devendra Fadnavis Allegations : दारुवरचे कर कमी होतात, पण पेट्रोल-डिझेलचे नाही -देवेंद्र फडणवीस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.