ETV Bharat / state

उस्मानाबाद: बॅरिकेट्स तोडून कंटेनर घुसला तंबूत, पोलीस - होमगार्डचा जागेवरच मृत्यू

author img

By

Published : Oct 10, 2019, 8:55 AM IST

उड्डाण पुलावर लावण्यात आलेल्या तंबूमध्ये बॅरिकेट्स तोडून कंटेनर घुसल्यामुळे अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. पहाटे 3 च्या सुमारास ही घटना घडली.

उस्मानाबाद

उस्मानाबाद : सोलापूर-औरंगाबाद मार्गावरील येडशीजवळ असलेल्या उड्डाण पुलावर लावण्यात आलेल्या तंबूमध्ये बॅरिकेट्स तोडून कंटेनर घुसल्यामुळे अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. पहाटे 3 च्या सुमारास ही घटना घडली. या ठिकाणी ड्युटीवर असलेले पोलीस कर्मचारी दिपक नाईकवाडी व होमगार्ड संतोष जोशी यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा - 'त्याने' तिघांना वाचवले...पण सख्ख्या भावालाच वाचवू शकला नाही

त्यांच्यासोबत असलेले दुसरे होमगार्ड गाडे हे जखमी झाले आहेत. सध्या नवरात्रोत्सवाच्या काळात वॉर्ड निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था राहावी, म्हणून जिल्ह्यात जोडणाऱ्या सर्वच रस्त्यांवर असे चेकपोस्ट उभा करण्यात आले आहेत. अशाच चेक पोस्ट उड्डाणपुलाजवळ उभा करण्यात आला होता. तेथे आज ही दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Intro:अपघातात पोलिस आणि होमगार्ड मृत्यू


उस्मानाबाद - सोलापूर-औरंगाबाद या मार्गावरील येडशी जवळ असलेल्या उड्डाण पुलावर लावण्यात आलेल्या तंबू मध्ये पहाटे 3 च्या सुमारास बॅरिकेट्स तोडून कंटेनर घुसल्यामुळे यात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे या ठिकाणी ड्युटीवर असलेले पोलीस कर्मचारी दिपक नाईकवाडी व होमगार्ड संतोष जोशी यांचा मृत्यू झाला आहे तर त्यांच्यासोबत असलेले दुसरे होमगार्ड गाडे हे जखमी झाले आहेत सध्या नवरात्रोत्सवाच्या काळात वर्ड निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था रहावे म्हणून जिल्ह्यात जोडणाऱ्या सर्वच रस्त्यांवर ते असे चेकपोस्ट उभा करण्यात आलेत आहेत असाच चेक पोस्ट जवळील उड्डाणपुलाजवळ उभा करण्यात आला होता तेथे आज ही दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहेBody:यात मयत पोलिस चा फोटो आहेConclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.