ETV Bharat / state

१६ वर्षा पासून सामजिक संदेश देणारी अनोखी येवला ते गाणगापूर सायकल यात्रा....

author img

By

Published : May 1, 2022, 3:15 PM IST

yeola to gangapur cycle yatra which has been giving social message for 16 years in nashik
येवला ते गाणगापूर सायकल यात्रा

संस्थेचे संस्थापकिय अध्यक्ष विजय भोरकडे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या संस्थेचा प्रमुख उद्देश पर्यावरणाचा होणारा विनाश थांबविणे, जनतेला सायकल चालविण्यास प्रोत्साहन देणे, वृषारोपन करून जमिनीची होणारी धूप थांबविने तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करणे हा आहे.

येवला ( नाशिक ) - येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील जय भवानी सामजिक व सांस्कृतिक संस्थेच्या वतीने गेल्या 16 वर्षांपासून अनोखा सामाजिक जनजागृती करणारी सायकल यात्रा येवला ते तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापुर असे एकूण ५२६ की.मी. सायकल यात्रा निघते. या सायकल यात्रे दरम्यान समाजातील सर्व स्तरांमध्ये समजिक संदेश दिला जातो.

असे आहेत सामाजिक संदेश - 'सायकल चालवा, देश वाचवा', 'पाणी आडवा, पाणी जिरवा', 'बेटी बचाव', 'वन्यजीव संरक्षण', 'नैसर्गिक संवर्धन', 'वाहतूक सुरक्षा' 'लोकन्यायालय व मध्यस्थ केंद्र' याचे महत्व, 'रक्तदान, अवयव दान' आदी विषयावर संदेश व जनजागृती मोहीम या सायकल यात्रे दरम्यान राबविली जाते. तसेच सायकल यात्रे दरम्यान वृक्षारोपण देखील केले जाते. संस्थेचे संस्थापकिय अध्यक्ष विजय भोरकडे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या संस्थेचा प्रमुख उद्देश पर्यावरणाचा होणारा विनाश थांबविणे, जनतेला सायकल चालविण्यास प्रोत्साहन देणे, वृषारोपन करून जमिनीची होणारी धूप थांबविने तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करणे हा आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.