ETV Bharat / state

गंगापूर धरणावर फोटो काढताना पाण्यात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

author img

By

Published : Apr 5, 2021, 10:50 PM IST

फोटो काढण्याच्या नादात दोन अल्पवयीन मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना नाशिक शहराच्या गंगापूर धरण परिसरामध्ये घडली.

dam
धरण

नाशिक - फोटो काढण्याच्या नादात दोन अल्पवयीन मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना नाशिक शहराच्या गंगापूर धरण परिसरामध्ये घडली. या घटनेने जुन्या नाशिक भागात शोककळा पसरली आहे.

हेही वाचा - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा बालकांना अधिक धोका

शाळांना सुटी असल्याने आज सकाळी जुन्या नाशिकातील सहा ते सात मुलांचा ग्रुप दुचाकींवरून भटकंती करिता बाहेर पडला. हे मित्र संध्याकाळी गंगापूर धरणावर पोहचले. संध्याकाळी सुर्यास्त बघून घरी परतण्याचा बेत आखलेला असताना फोटोसेशन करताना कैफ उमर शेख (वय 16), साबीर सलीम शेख (वय 15, दोघे रा. खडकाली, त्र्यंबक पोलीस चौकीमागे) हे अचानकपणे धरणाच्या पाण्यात पडले. एकमेकांना वाचविण्यासाठी दोघांनी प्रयत्न केला, मात्र पोहता येत नसल्याने व पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही गटांगळ्या खाऊ लागले. यावेळी त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून त्यांच्यासोबत आलेले अन्य मित्रदेखील धावले, मात्र तोपर्यंत दोघेही पाण्यात बुडाले होते.

मित्रांनी आजूबाजूला धाव घेत स्थानिक नागरिकांना मदतीला बोलावले. काही स्थानिक जलतरणपटूंनी पाण्यात उतरून दोघांना बाहेर काढण्यासाठी शोध सुरू केला. सुमारे अर्धा तासानंतर साबीर आणि कैफ यांचे मृतदेह हाती आले. या घटनेनंतर तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून मुलांच्या मृत्यूने जुन्या नाशिक परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा - नाशिकमध्ये ३० एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध; प्रत्येक वीकएन्डला पूर्ण लाॅकडाऊन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.