ETV Bharat / state

वासाळीत महाकाय अजगराच्या तावडीतून बकरीची सुटका, दोन दिवसांपूर्वी बिबट्याने पाडला होता श्वानाचा फडशा

author img

By

Published : Dec 10, 2020, 7:53 PM IST

अजगर बातमी
अजगर बातमी

इगतपुरी तालुक्यातील वासाळी परिसरात वनखात्याने एका बकरीची अजगराच्या तावडीतून सुटका केली आहे. याच परिसरात दोन दिवसांपूर्वी बिबट्याचे दर्शन घडले होते. यामुळे याठिकाणच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

नाशिक - इगतपुरी तालुक्यातील वासाळी परिसरात दोन दिवसांपूर्वी बिबट्या निदर्शनास आल्यानंतर बुधवारी (दि. 9 डिसें.) या परिसरात एका शेतकऱ्याची बकरी चक्क एका महाकाय अजगराने विळख्यात अडकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून या बकरीची अजगराच्या तावडीतून सुटका करून तिचा जीव वाचविला आहे. या अजगराला वनविभागाने ताब्यात घेऊन जंगलात निर्जनस्थळी सोडले आहे.

अजगराच्या तावडीतून बकरीची सुखरूप सुटका

इगतपुरी तालुक्यातील वासाळी येथे दोन दिवसांपूर्वी एका बिबट्याने पाळीव श्वानाचा फडशा पाडल्याची घटना ताजी असताना बुधवारी (दि. 9 डिसें.) सायंकाळी या गावाच्या वनविभागाच्या हद्दीत असलेल्या भागात गावातील तुकाराम खादे या शेतकऱ्यांच्या बकऱ्या चरण्यासाठी सोडल्या होत्या. संध्याकाळ झाल्याने या बकऱ्या गोळा करत असताना एक बकरी कमी झाल्याचे दिसून आले. म्हणून शेतकऱ्याने या बकरीचा शोध घेतला असता जवळील एका खडकावर एक महाकाय अजगर या बकरीला विळख्यात घेऊन मारत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी या शेतकऱ्याने आरडाओरडा करत स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने या बकरीची अजगराच्या तावडीतून सुखरुप सुटका केली आहे.

ग्रामस्थ भयभीत

कधी बिबट्याचे तर कधी अजगराचे दर्शन होत असल्याने वासाळी येथील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. वनविभागाने या अजगराला ताब्यात घेऊन सुरक्षित स्थळी सोडण्यात आले आहे.

हेही वाचा - गोदावरी नदीची सिमेंट-काँक्रिटीकरण मुक्तीकडे वाटचाल; 17 प्राचीन कुंड होणार पुनर्जीवित

हेही वाचा - फी न भरल्यास विद्यार्थ्यांचे 'ऑनलाइन' शिक्षण बंद; नाशिक स्कूल असोसिएशनचा निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.