ETV Bharat / state

'अजित पवारांचा नेम अचूक, मात्र, चुकेल या भीतीनं मी नेम लावलाच नाही'

author img

By

Published : Jan 31, 2020, 10:27 PM IST

Updated : Jan 31, 2020, 11:59 PM IST

अजित पवारांचा नेम अचूक लागला, मात्र, माझा नेम चुकेल या भीतीने मी नेम लावलाच नसल्याचे वक्तव्य आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राधाकृष्ण विखे पाटील हे एकत्र बॅडमिंटन खेळले. त्यानंतर विचारलेल्या प्रश्नाला विखे पाटील यांनी उत्तर दिले.

Radhakrushn vikhe patil comment on ajit pawar in nashik
अजित पवार आणि राधाकृष्ण विखे पाटील

नाशिक - अजित पवारांचा नेम अचूक लागला, मात्र, माझा नेम चुकेल या भीतीने मी नेम लावलाच नसल्याचे वक्तव्य आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले. एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राधाकृष्ण विखे-पाटील हे एकत्र बॅडमिंटन खेळले. त्यानंतर विचारलेल्या प्रश्नाला विखे पाटील यांनी उत्तर दिले.

'अजित पवारांचा नेम अचूक, मात्र, चुकेल या भीतीनं मी नेम लावलाचं नाही'

अजित पवार आणि माझी भेट ही राजकीय नसून, एक मित्र म्हणून त्यांना भेटल्याचे विखे पाटील म्हणाले. मागील साडेचार वर्षात अजित पवार आणि आम्ही एकत्रित महाराष्ट्रात संघर्ष यात्रा काढली होती. एक मित्र म्हणून अजित पवार यांच्याशी मी भेटलो, यात कोणतीच राजकीय चर्चा झाली नाही. इलेक्शनमध्ये असलेली कटुता तात्पुरती असते आणि निवडणूक संपल्यानंतर ते विसरावे लागते, तरच आपण प्रगती करू शकतो. राजकारणात देखील खेळीमेळीचे वातावरण असले पाहिजे असेही विखे पाटील म्हणाले. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री छगन भुजबळ आणि विखे पाटील हे एकत्रित बॅडमिंटन खेळले.

अजित पवार आणि राधाकृष्ण विखे पाटील
sample description
Last Updated : Jan 31, 2020, 11:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.