ETV Bharat / state

नाशिककरांना इंधन दरवाढीचा फटका, पेट्रोल शंभरीपार

author img

By

Published : May 28, 2021, 8:27 PM IST

शहर आणि जिल्ह्यात पेट्रोलचे दर शंभरीपार पोहोचले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात पेट्रोलचा दर हा प्रति लिटर 100.38 रुपये इतका आहे. डिझेलच्या दरातही वाढ झाली असून, डिझेलचे दर 90.89 रुपयांवर पोहोचले आहेत. इंधनाचे दर वाढल्यामुळे सर्व सामान्य जनता मात्र हवालदिल झाली आहे.

नाशिककरांना इंधन दरवाढीचा फटका
नाशिककरांना इंधन दरवाढीचा फटका

नाशिक - शहर आणि जिल्ह्यात पेट्रोलचे दर शंभरीपार पोहोचले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात पेट्रोलचा दर हा प्रति लिटर 100.38 रुपये इतका आहे. डिझेलच्या दरातही वाढ झाली असून, डिझेलचे दर 90.89 रुपयांवर पोहोचले आहेत. इंधनाचे दर वाढल्यामुळे सर्व सामान्य जनता मात्र हवालदिल झाली आहे.

पश्चिम बंगाल व पाच राज्यांच्या निवडणुकांमुळे इंधन दरवाढ टाळण्यात येत होती. मागील दीड महिन्यांपासून पेट्रोल प्रतिलिटर ९७ व डिझेल ८८ रुपये इतके होते. मात्र, निवडणुकांचा निकल लागताच इंधनामध्ये दरवाढ करण्यात आली. आंतराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल प्रतिबॅलर ६८ ते ७० डाॅलर इतके आहे. तरी देखील पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल प्रति लिटर शंभरीपार गेले आहे. तर डिझेल नव्वदी पार पोहोचले आहे. इंधन दरवाढीमुळे माहागाईमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

नाशिककरांना इंधन दरवाढीचा फटका, पेट्रोल शंभरीपार

कोरोना संकटात इंधन दरवाढ

लॉकडाऊमुळे आधीच अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. सर्व व्यवाहार ठप्प असल्यामुळे आर्थिक उलाढाल देखील मंदावली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सातत्याने इंधन दरवाढ होत असल्याने सर्वसामान्य जनता आर्थिक अडचणीमध्ये सापडली आहे. इंधन दरवाढीमुळे अत्यावश्यक वस्तुंच्या दरामध्ये देखील वाढ झाली आहे.

हेही वाचा - घरांच्या किमती प्रति चौरस फूट 250 रुपये दराने वाढणार? बिल्डर संघटनेने 'ही' केली मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.