ETV Bharat / state

नारायण राणेंच्या अडचणीत वाढ, नाशिक पोलिसांनी बजावली नोटीस

author img

By

Published : Aug 25, 2021, 9:10 AM IST

Updated : Aug 25, 2021, 9:33 AM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल बरळणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. नाशिक पोलिसांनी आता 2 सप्टेंबरला राणेंना पोलीस ठाण्यात हजर राहण्याबाबत नोटीस बजावली आहे. सध्या राणे जामीनावर बाहेर आहेत. त्यांना महाड पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान, अटक टाळण्यासाठी राणेंनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

Narayan Rane
Narayan Rane

नाशिक : केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना 2 सप्टेंबरला नाशिकमध्ये (Nashik) हजर राहण्यासाठी नाशिक पोलिसांच्या वतीने नोटीस (Notice) बजावण्यात आली आहे. त्यामुळे नारायण राणे आज (25 ऑगस्ट) नाशिकमध्ये हजर राहणार नाहीत, हे आता स्पष्ट झाले आहे.

म्हणून राणेंना नाशिक पोलिसांची नोटीस

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याबद्दल खालच्या थराचे आक्षेपार्ह वक्तव्य (Offensive statement) राणे यांनी केले. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसैनिकांनी राडा केला. तसेच राष्ट्रवादीनेही राणेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. दरम्यान, नाशिकमध्येही शिवसेनेचे महानगरप्रमुख तथा नगरसेवक सुधाकर बडगुजर (Nashik corporator Sudhakar Badgujar) यांनी सायबर पोलीस (Nashik Cyber Police) ठाण्यात भा द वि 500, 502, 505, 153 या कलमांनुसार गुन्हा दाखल (Filed a crime) केला आहे. यात जातीय तेढ निर्माण करणे, द्वेष निर्माण करणे यासारखी कलमे लावण्यात आलेली आहेत. या गुन्ह्यांची दखल घेऊन नाशिकचे पोलीस आयुक्त यांनी नारायण राणे यांना अटक करण्यासाठी एक स्वतंत्र पथक तयार केले होते आणि ते पथक काल (24 ऑगस्ट) राणे यांना ताब्यात घेण्यासाठी कोकणामध्ये दाखल झाले होते. परंतु महाड येथील पोलिसांनी या प्रकरणी ताब्यात घेतले. यादरम्यान नाशिक पोलीस पथकाचे अधिकारी पोलीस निरीक्षक आनंद वाघ (Police Inspector Anand Wagh) यांनी नारायण राणे यांना नाशिकमध्येही तुमच्या विरोधात पहिला गुन्हा दाखल झाला आहे. त्याबाबत तुम्हाला जबाब देण्यासाठी 2 सप्टेंबरला हजर राहण्याची नोटीस दिली आहे, असे सांगितले.

या ठिकाणी राणेंविरोधात गुन्हा दाखल

राज्यात राणे यांच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. नाशिकमध्ये पहिला गुन्हा दाखल झाला. राणेंविरोधात जिथे जिथे गुन्हा दाखल झालेला आहे जेथून त्यांना नोटीस बजावली जाणार असल्याचे समोर आले आहे. नाशिक, पुणे, ठाणे, महाड आणि औरंगाबाद येथे गुन्हा दाखल झाला आहे. राणेंना आपलं म्हणणं मांडण्यासाठी प्रत्येक ठिकाणी हजर राहावे लागणार आहे. नारायण राणे कशा पद्धतीने हे प्रकरण घेतात? हे पाहावं लागेल.

अटक टाळण्यासाठी राणेंची उच्च न्यायालयात धाव

तर, अटक टाळण्यासाठी राणेंनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी याचिका (petition) दाखल केली आहे. राज्यात अनेक ठिकाणी माझ्या विरोधात बेकायदेशीर गुन्हे दाखल झाले आहेत. ते रद्द करण्यात यावेत, अशी याचिका दाखल केलेली आहे. मुंबई उच्च न्यायालया काय निर्णय देतंय? याकडेही लक्ष लागले आहे.

नक्की काय म्हणाले राणे?

'देशाच्या स्वातंत्र्याला किती वर्षे झाली हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना माहिती नाही. कुणाला तरी विचारतात हिरक महोत्सव आहे काय? मी असतो तर कानाखाली चढवली असती. देशाच्या स्वातंत्र्यदिनाची माहिती नसावी? किती चीड आणणारी गोष्ट आहे. बाजुला एखादा सेक्रेटरी ठेव आणी बोल म्हणावं. सरकार कोण चालवतंय ते कळतच नाही. ड्रायवरच नाही', असे भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटले आहे. पाहा व्हिडिओ

हेही वाचा - 'नारायण राणे "कोंबडी चोर"', मुख्यमंत्र्यांवरील टीकेनंतर शिवसैनिक संतप्त

Last Updated : Aug 25, 2021, 9:33 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.