ETV Bharat / state

माझी मानसिकता त्यांनी तपासावी, मी त्यांचे डोके चेक करेन - चंद्रकांत पाटील

author img

By

Published : Nov 20, 2021, 9:06 PM IST

Updated : Nov 20, 2021, 9:20 PM IST

माझी मानसिकता कोणी तपासावी मी त्यांचे डोके चेक करेन
माझी मानसिकता कोणी तपासावी मी त्यांचे डोके चेक करेन

नाशिक येथे एका विवाह सोहळ्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आले होते. ते माध्यमांशी बोलताना म्हणाले की, सध्या राज्यामध्ये काही लोकांना कामच नाही. त्यामुळे ते नको त्या विषयावर नको ती चर्चा करत राहतात. मी संजय राऊत यांच्या कोणत्याही प्रश्नाला गंभीरतेने घेत नाही.

नाशिक - माझी मानसिकता त्यांनी तपासावी. मी त्यांचे डोके चेक करेन, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत आणि नवाब मलिक या दोघांना लगावला आहे. सध्या काही व्यक्तींना कामच नाही. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलेले चांगले, असेही भाजप प्रदेशाध्यक्षांनी म्हटले.


नाशिक येथे एका विवाह सोहळ्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Maharashtra BJP president Chandrakant Patil) आले होते. ते माध्यमांशी बोलताना म्हणाले की, सध्या राज्यामध्ये काही लोकांना कामच नाही. त्यामुळे ते नको त्या विषयावर नको ती चर्चा करत राहतात. मी संजय राऊत यांच्या कोणत्याही प्रश्नाला गंभीरतेने घेत नाही. त्यामुळे त्यांच्याविषयी बोलणे योग्य नाही. राज्याचे मंत्री नवाब मलिक हे नुसते बोलत राहतात. पण काही करत नाहीत.

माझी मानसिकता त्यांनी तपासावी, मी त्यांचे डोके चेक करेन

हेही वाचा-Corona Update : राज्यात शनिवारी 2271 रुग्णांना डिस्चार्ज, 833 नवे रुग्ण तर 15 रुग्णांचा मृत्यू

पंतप्रधानांनी मोठे मन दाखवून कायदे मागे घेतले-

पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले, की त्यांनी माझी मानसिकता चेक करावी. मी त्यांचे डोके चेक करतो म्हणजे मला कळेल की त्यांची स्मृती किती कमी झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी आणि जनतेच्या हिताचा कायदा (Chandrkant Patil Slammed Anil Parab) आणला होता. परंतु या कायद्याचा अर्थ समजला नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे मन दाखवून कायदा मागे घेतला.

हेही वाचा-नाशिक : डॉक्टर वधूची होणार कौमार्य चाचणी? अंनिसची त्र्यंबकेश्वर पोलिसांत तक्रार

ताकाला जायचे अन् भांडे लपवायचे याचा का उपयोग नाही

राज्य परिवहन महामंडळाच्या संपाबाबत बोलताना चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil Slammed Anil Parab) म्हणाले, की परवा अनिल परब फडणवीस यांच्या घरी आले. पण ते संपाबाबत चर्चा करण्यासाठी नाही तर शरद राव रणपिसे यांच्या निधनाने झालेल्या रिक्त जागेवर विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी आले होते. ताकाला जायचे आणि भांडे लपवायचे याचा काही उपयोग नाही. एखाद्या विद्यार्थ्याप्रमाणे हा संप कसा मिटेल याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी अनिल परब यांना सांगितले. आता त्यावर काय निर्णय घ्यायचा हे सरकारने ठरविले पाहिजे, असे त्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा-Clean Survey 2021 : स्वच्छ सर्वेक्षणात पुण्याची बाजी, स्पर्धेत पुणे देशात पाचवे

Last Updated :Nov 20, 2021, 9:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.