ETV Bharat / state

Accused Arrested in Nashik : औरंगाबाद येथील तरुणीच्या हत्येतील आरोपीला नाशिक मध्ये अटक; एकतर्फी प्रेमातून केली होती हत्या...

author img

By

Published : May 22, 2022, 10:09 PM IST

Accused Arrested
Accused Arrested

एकतर्फी प्रेमातून भरदिवसा कॉलेजजवळ तरुणीची भोसकून हत्या ( Young woman stabbed to death करण्यात आली आहे. तसेच संशयित मारेकऱ्यास नाशिक ग्रामीण पाेलिसांनी लासलगाव येथून अटक केली आहे. शरण सिंग असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. ग्रंथी सुखप्रीत कव्हर प्रितपालसिंग (19 रा. औरंगाबाद) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे.

नाशिक : औरंगाबाद शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात एकतर्फी प्रेमातून ( Murder out of one-sided love ) भरदिवसा कॉलेजजवळ तरुणीची भोसकून हत्या करण्यात आली आहे. तसेच संशयित मारेकऱ्यास नाशिक ग्रामीण पाेलिसांनी लासलगाव येथून अटक ( Accused Arrested from Lasalgaon ) केली आहे. शरण सिंग असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. ग्रंथी सुखप्रीत कव्हर प्रितपालसिंग (19 रा. औरंगाबाद) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे.


देवगिरी महाविद्यालयाजवळ ( Near Devagiri College ) (दि.21) ही घटना घडली हाेती. मृत 19 वर्षीय विद्यार्थींनी बीबीएच्या प्रथम वर्गात शिकत होती. दुपारी तरुणी देवगिरी महाविद्यालयाबाहेर आली असता एक तरुण तिथे आला. यावेळी दोघात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर तरुणीस कॉलेज समोरून 200 फुट ओढत नेत तरुणाने तिला चाकूने भोसकले. हा धक्कादायक प्रकार एकतर्फी प्रेमातून झाल्याची समाेर आले आहे. औरंगाबाद पोलिसांना संशयिताची माहिती मिळताच त्याच्या अटकेसाठी चार पथके रवाना केली हाेती. मात्र, नाशिक ग्रामीणचे पाेलिस अधिक्षक सचिन पाटील यांना संशयित लासलगाव येथे असल्याची माहिती समजली. त्यांच्या सूचनेनुसार पथकाने शरण सिंगला ताब्यात घेतले ( Accused Sharan Singh arrested ). हत्या झालेली मुलगी आणि संशयित सिंग एकमेकांना ओळखत होते असे तपासात समाेर आले आहे.



बहिणीच्या घरी लपला हाेता -
लासलगाव येथून पोलिसांनी आरोपी शरण सिंग याला ताब्यात घेतलं आहे. आरोपी आपल्या बहिणीच्या घरी लपून बसला होता. सिंग याने तरुणीला 200 फूट दूरपर्यंत ओढत नेले आणि तिचा गळा चिरून निर्घृणपणे हत्या केली. आरोपी तरुणीला ओढत नेत असल्याचे घटनास्थळावरील सीसीटीव्हीत कैद झाले होते.

हेही वाचा - Murder Of Girl Student : भरदिवसा 200 फुट ओढत नेऊन विद्यार्थिनीची हत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.