नाशिक जिल्ह्यातील 24 पैकी 19 धरणांमध्ये 80 टक्के जलसाठा

author img

By

Published : Sep 20, 2021, 7:51 PM IST

dam position nashik

नाशिक जिल्ह्यातील 24 पैकी 19 धरणांमध्ये 80 टक्के पाणीसाठा झाला आहे. नाशिक जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या संततधार पावसामुळे पुढील वर्षापर्यंत जिल्ह्यातील पाणी प्रश्न मिटला आहे.

नाशिक - नाशिक जिल्ह्यातील 24 पैकी 19 धरणांमध्ये 80 टक्के पाणीसाठा झाला आहे. नाशिक जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या संततधार पावसामुळे पुढील वर्षापर्यंत जिल्ह्यातील पाणी प्रश्न मिटला आहे. नाशिक जिल्ह्यातील लहान मोठ्या 24 धरणांपैकी 19 धरणात 80 टक्के हुन अधिक पाणीसाठा असून यातील 15 धरणे 90 टक्केपेक्षा अधिक भरली आहेत.

धरणांचा जिल्हा म्हणून नाशिकची ओळख आहे. नाशिकमध्ये सात मोठे प्रकल्प तर 17 मध्यम प्रकल्प आहेत. नाशिक शहरात जून, जुलै महिन्यात पावसाने दडी मारल्याने महानगरपालिकेने आठवड्यातून एकदा पाणी कपात केली होती. मात्र ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या संततधार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्व धरणे भरली आहेत. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण 98 टक्के भरले आहे. आठ दिवसापूर्वी गंगापूर धरणातून हजारो क्यूसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. हे सर्व पाणी जायकवाडी धरणाला जाऊन मिळाले आहे. नाशिक जिल्ह्यातील 24 धरणांत मिळून सद्यस्थितीला एकूण 78 टक्के पाणीसाठा आहे. तर एकूण 51 हजार 71 दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे.

हे ही वाचा -उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात मोठी ढगफुटी: 5 जण जखमी


कुठली धरणे 90 टक्के पेक्षा अधिक भरली ?

  • गंगापूर धरण 98 टक्के
  • गौतमी गोदावरी 96 टक्के
  • पालखेड 96 टक्के
  • वाघाड 97 टक्के
  • पुणेगाव 96 टक्के
  • दारणा 98 टक्के
  • भावली 100 टक्के
  • वालदेवी 100 टक्के
  • कडवा 98 टक्के
  • चणकापुर 94 टक्के
  • हरणबारी 100 टक्के
  • केळझर 100 टक्के
  • नाग्यासाक्या 100 टक्के
  • पुनद 100 टक्के
  • माणिकपुंज 97टक्के
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.