ETV Bharat / state

धरणावर मित्राचा वाढदिवस साजरा करणे पडले महागात, वालदेवी धरणात बुडून 6 जणांचा मृत्यू

author img

By

Published : Apr 17, 2021, 8:14 PM IST

मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या नऊ जणांपैकी सहा जणांचा पिंपळस शिवारातील वालदेवी लघु पाटबंधारे प्रकल्पात बुडून मृत्यू झाला आहे. फोटो काढत असताना ही दुर्दैवी घटना घडली. हे सर्वजण नवीन नाशिक भागातील सिंहस्थनगर परिसरातील रहिवासी आहेत. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त कोली जात आहे.

वालदेवी धरणात बुडून 6 जणांचा मृत्यू
वालदेवी धरणात बुडून 6 जणांचा मृत्यू

नाशिक - मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या नऊ जणांपैकी सहा जणांचा पिंपळस शिवारातील वालदेवी लघु पाटबंधारे प्रकल्पात बुडून मृत्यू झाला आहे. फोटो काढत असताना ही दुर्दैवी घटना घडली. हे सर्वजण नवीन नाशिक भागातील सिंहस्थनगर परिसरातील रहिवासी आहेत. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त कोली जात आहे.

मित्राचा वाढदिवस धरणावर जाऊन साजरा करणे सहा जणांच्या जीवावर बेतले असून, वालदेवी धरणात सहा जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर तीन जणांचा जीव वाचला आहे. धरण परिसरात फोटो काढत असताना पाय घसरल्याने ही घटना घडली. दरम्यान सहाही जणांचे मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरून ते पाण्यात पडल्याचा आंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

वालदेवी धरणात बुडून 6 जणांचा मृत्यू

घटनेत सहा जणांचा मृत्यू

शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. काही लोकांना धरणातील पाण्यात मृतदेह तरंगत असल्याचे आढळून आल्याने त्यांनी पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला याची माहिती दिली. दरम्यान माहिती मिळताच पोलीस व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र रात्री आंधार पडल्यामुळे शोधकार्य थांबवण्यात आले होते. शनिवारी सकाळपासून यातील बेपत्ता मुलांचा शोध घेण्यात आला. दरम्यान शनिवारी दुपारी यातील सर्व मृतदेह पोलिसांच्या हाती लागले. आरती भालेराव, नदिया वजीर, खुशी वजीर, ज्योती गमिंग, सोनी गमे आणि हिंमत चौधरी अशी यातील मृतांची नावे असून, 9 जणांपैकी तीन जण बचावली आहेत. मात्र घडलेल्या या प्रकाराने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, लॉकडाउन असतानाही ही मुले या ठिकाणी पोहोचलीच कशी असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.

हेही वाचा - राज्यात आणखी कठोर निर्बंध लावण्याची आवश्यकता - मुश्रीफ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.