ETV Bharat / state

घोरपडीची शिकार पडली महागात; हॉटेल मालकासह आचाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल

author img

By

Published : Jul 24, 2020, 12:03 PM IST

Crime news
घोरपडीची शिकार पडली महागात; वनविभागाकडून हॉटेल मालकासह खानसामाविरुध्द गुन्हा दाखल

घोरपडीची शिकार करून नारायणपूर रस्त्यावरील साई गार्डन हॉटेलवर पार्टी रंगली असल्याची गुप्त माहिती वनविभागाचे अधिकारी गणेश रणदिवे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे गणेश रणदिवे यांनी आपल्या पथकासह हॉटेल साई गार्डनवर छापा टाकला.

नंदुरबार - नवापूर येथे वन्य प्राण्याची शिकार करून पार्टी सुरू असलेल्या साई गार्डन हॉटेलवर वनविभागाच्या पथकाने धाड टाकली. घोरपड या दुर्मिळ प्रजातीच्या प्राण्याची कातडी व अवशेष जप्त करण्यात आल्याची घटना नवापूर शहरात घडली आहे. याप्रकरणी हॉटेल मालकासह स्वयंपाक्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घोरपडीची शिकार करून नारायणपूर रस्त्यावरील साई गार्डन हॉटेलवर पार्टी रंगली असल्याची गुप्त माहिती वनविभागाचे अधिकारी गणेश रणदिवे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे गणेश रणदिवे यांनी आपल्या पथकासह हॉटेल साई गार्डनवर छापा टाकून तपासणी केली. या तपासणीत हॉटेलच्या किचनमध्ये एका कोपर्‍यात मृत घोरपडीच्या कातडीसह अवशेष आढळून आले. वनविभागाच्या पथकाने ते जप्त केले. दरम्यान, गुजरात राज्यातील तीन ते चार व्यक्तींनी घोरपडीची शिकार करून मटण तयार करण्यासाठी हॉटेल साई गार्डनमध्ये ऑर्डर दिली होती. शिकार करण्यात आलेली घोरपड दीड ते दोन किलोची होती. घोरपडीचे मांसची मेजवानी करण्यात आली.

नंदुरबार वनविभागाचे उपविभागीय अधिकारी गणेश रणदिवे यांच्या पथकाने हॉटेल मालकासह खानसामा या दोघांविरुध्द भारतीय वन अधिनियम 1927 व वन्यजीव कायदा 1972 प्रमाणे कारवाई केली असून, दोघाही संशयीत आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान गुजरात राज्यातील तिघांनी घोरपडची शिकार करून मेजवानीसाठी नवापूर शहरातील साई गार्डन हॉटेलवर आणली होती. त्यानंतर मोठ्या उत्साहात मेजवानी रंगली होती. अतिशय दुर्मिळ होत चाललेल्या घोरपडीची शिकार मोठ्या संख्येने आजही होत आहे. वनविभागाने गेल्या काही महिन्यांपुर्वी लॉकडाऊन दरम्यान गावठी पिस्तुलने वन्यप्राण्याची शिकार करण्यार्‍या टोळीचा पर्दाफाश केला होता.

घोरपडची कातडी व अवशेष तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे. शिकार करण्यात आलेला प्राणी हा घोरपड असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. घोरपड असल्याचा खुलासा झाला असला तरी अधिकृतरित्या हा प्राणी घोरपड असल्याची खात्री करण्यासाठी मृत घोरपडीचे अवशेष तपासणीसाठी नाशिक येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे.

दुर्मिळ घोरपड सुची क्रमांक 1 मधील वन्यप्राणीनामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या दुर्मिळ घोरपड हा वन्यजीव कायद्याचा सुची क्रमांक 1 मधील वन्यप्राणी आहे. घोरपडीची शिकार करण्याचा गुन्हा सिध्द झाल्यास आरोपींना तीन ते सात वर्षाची शिक्षा तसेच 25 हजाराचा दंड होण्याची तरतुद कायद्यात आहे.

तीन वर्षात दुसरी कारवाई -

नंदुरबार जिल्ह्यात दुर्मिळ घोरपडीप्रकरणी वनविभागाची ही दुसरी कारवाई आहे. यापूर्वी 2017 मध्ये नंदुरबार शहरातील कोकणीहिल परिसरात विक्रीसाठी आलेल्या चार जिवंत घोरपड वनविभागाच्या पथकाने जप्त केल्या होत्या. याप्रकरणी तीन ते चार जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. ते प्रकरण साड्या न्यायप्रविष्ठ आहे. त्यानंतर आता तिसर्‍या वर्षी वनविभागाने नवापूर येथील साई गार्डन हॉटेलवर घोरपडची शिकार करुन मेजवानी करण्यात आली. याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई नंदुरबार उपविभागीय वनाधिकारी गणेश रणदिवे, वनपाल प्रकाश मावची, वनपाल डि.के.जाधव, कल्पेश अहिरे, प्रशांत सोनवणे, पदमोर, वनरक्षक दिपक पाटील, माजी सैनिक शिरसाठ व वन कर्मचारी यांच्या पथकाने केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.