ETV Bharat / state

नंदुरबारमध्ये 25 जणांचे कोरोनाअहवाल पॉझिटिव्ह; बाधितांची संख्या 515 वर

author img

By

Published : Jul 29, 2020, 10:10 AM IST

Nandurbar corona update
नंदुरबार कोरोना अपडेट

जिल्ह्यात बाधितांचा आकडा 515 वर पोहोचला आहे. त्यापैकी 330 व्यक्तींनी कोरोनावर मात करुन बरे झाले आहेत. तसेच 143 रुग्ण उपचार घेत असून 28 जणांचा मृत्यू झाला आहे.

नंदुरबार - मंगळवारी दिवसभरात आलेल्या अहवालात 25 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. चार महिन्यांपूर्वी ग्रीन झोनमध्ये असणार्‍या नंदुरबार जिल्ह्याने कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत 500 चा टप्पा पार केला असून रुग्णांची संख्या 515 वर पोहोचली आहे. तीन जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला असल्याचे स्पष्ट झाल्याने जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 28 झाली आहे. शहादा कुकडेल येथील 60 वर्षीय पुरूष व तळोदा येथील रामकृष्ण नगरातील 70 वर्षीय वृध्द महिलेचा अहवाल मृत्यूनंतर प्राप्त झाला आहे. तर शहाद्यातील एका 62 वर्षीय बाधित महिलेचा मंगळवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला.सर्वाधिक रुग्ण नंदुरबार शहर व शहाद्यातील आहेत. यामुळे जिल्हावासियांची चिंता अधिकच वाढली आहे.

जिल्ह्यात मार्चपर्यंत एकही रुग्ण नसल्याने ग्रीन झोनमध्ये होता. या जिल्ह्यात एप्रिलच्या अखेरीपर्यंत कोरोनाचे अल्प रुग्ण आढळले होते. त्यामुळे या जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग नसताना कडकडीत लॉकडाऊन पाळण्यात आले. परंतु मे नंतर जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज येणार्‍या अहवालात झपाट्याने वाढ झाली. जून महिन्याच्या सुरुवातीला नंदुरबार जिल्ह्याने कोरोनाच्या आकडेवारीत शंभरी पार केली. तर अवघ्या दिड महिन्यातच जिल्ह्यात संसर्ग वाढल्याने नंदुरबार व शहादा ही दोन शहरे कोरोनाची हॉटस्पॉट बनली. दररोज येणार्‍या अहवालात 15 ते 20 हून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत त्याचप्रमाणे कोरोनामुक्तही झालेत.

प्रशासनाने खबरदारी म्हणून संचारबंदीही लागू करुन शहर लॉकडाऊन केले आहे. परंतु कोरोनाबाधितांचा वाढता आकडा सुरुच आहे. काल आलेल्या अहवालात दिवसभरात कोरोनाचे 25 रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने नंदुरबार जिल्ह्याने 500 चा टप्पा अखेर पार केला आहे.सर्वाधिक रुग्ण हे नंदुरबार शहरातील आहेत. नंदुरबार येथील हरीभाऊ नगरातील 17 वर्षीय युवती, 40 वर्षीय महिला, भाग्योदय नगरात 61 वर्षीय पुरूष, म्हाडा कॉलनीत 80 वर्षीय वृध्द महिला, गणेश नगरात 34 वर्षीय पुरूष, 29 वर्षीय महिला, 10 वर्षीय बालिका, 53 वर्षीय महिला, धर्मराज नगरात 64 वर्षीय महिला, 44 वर्षीय पुरूष, 15 वर्षीय युवक, शिवाजी रोड कासारगल्लीत 70 वर्षीय वृध्द महिला, देसाईपुर्‍यात 23 वर्षीय महिला, 24 वर्षीय महिला, जुनी भोईगल्लीत 45 वर्षीय महिला, गुरुकुल नगरात 55 वर्षीय पुरूष, कुंभारगल्ली देसाईपुर्‍यात 52 वर्षीय पुरुष,नंदुरबार तालुक्यातील खोंडामळी येथे 34 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे.

शहादा शहरातील गरीब नवाज कॉलनीत 31 वर्षीय महिला, मच्छीबाजारात 38 वर्षीय पुरूष, 16 वर्षीय युवती, 14 वर्षीय युवती, नागेश नगरात 23 वर्षीय महिला, शहादा तालुक्यातील वैजाली येथे 34 वर्षीय पुरूष व तळोदा येथील गुरुकृपा कॉलनीत 74 वर्षीय वृध्द पुरुष असे 25 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

दरम्यान, मंगळवारी 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. शहादा, कुकडेल येथील एका 60 वर्षीय पुरूषाचा शनिवारी(25 जुलै) मृत्यू झाला होता. तसेच तळोदा येथील रामकृष्ण नगरातील 70 वर्षीय वृध्द महिलेचा सोमवारी मृत्यू झाला होता. या दोन्ही मृत व्यक्तींचे अहवाल रात्री उशिराने पॉझिटिव्ह प्राप्त झाले. शहादा नगरपालिकेजवळील रहिवासी बाधित 62 वर्षीय वृध्द महिलेचा पहाटेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला.

23 जण कोरोनामुक्त

मंगळवारी 23 जण कोरोनावर मात करुन संसर्गमुक्त झाले आहेत. यात नंदुरबार हौसिंग सोसायटीतील 13 वर्षीय युवती, देसाईपुरातील 48 वर्षीय महिला, 48 वर्षीय पुरुष, तापी क्वारंटाईन सेंटर मधील 55 वर्षीय महिला,60 वर्षीय महिला, भाट गल्लीतील 23 वर्षीय महिला,65 वर्षीय पुरुष, 61 वर्षीय महिला व 3 वर्षीय बालिका, रायसिंगपुरातील 65 वर्षीय पुरुष, 51 वर्षीय पुरुष, माळीवाड्यातील 38 वर्षीय पुरुष, शिवाजी रोड परिसरातील 44 वर्षीय पुरुष, सरस्वती नगर परिसरातील 20 वर्षीय पुरुष, 22 वर्षीय महिला, भाट गल्लीतील 65 वर्षीय पुरुष, नंदुरबार मधील 32 वर्षीय पुरुष, शहादा येथील गरीब नवाज कॉलनीतील 40 वर्षीय पुरुष, 14 वर्षीय युवक, 36 वर्षीय महिला, शहादा तालुक्यातील मंदाणा येथील 30 वर्षीय पुरुष तर नवापूर येथील शेफाली पार्कमधील 42 वर्षीय पुरुष अशा एकूण 23 जणांचा समावेश आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.