ETV Bharat / state

प्रशासनाच्या नियोजनामुळे नंदुरबार जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

author img

By

Published : Jul 14, 2021, 4:04 PM IST

Updated : Jul 14, 2021, 4:22 PM IST

नंदुरबार कोरोना
नंदुरबार कोरोना

जिल्हा प्रशासनाने वेळेवर केलेल्या योग्य नियोजनामुळे जिल्ह्यात आता दिवसाला एक किंवा दोन रुग्ण आढळून येत आहेत. जिल्ह्यात आयसीयू बेड, व्हेंटिलेटर बेड 99 टक्के रिकामे आहेत. ऑक्सिजन प्लांटसारख्या सुविधा तयार केल्याने आरोग्याचा बाबतीत जिल्हा सक्षम होत आहे.

नंदुरबार - जिल्ह्याच्या कोरोना रुग्णांची परिस्थिती हळूहळू कमी होत आहे. जिल्ह्यात एकेकाळी दररोजचे 1200 ते 1300 रुग्ण आढळून येत होते. मात्र जिल्हा प्रशासनाने वेळेवर केलेल्या योग्य नियोजनामुळे जिल्ह्यात आता दिवसाला एक किंवा दोन रुग्ण आढळून येत आहेत. जिल्ह्यात आयसीयू बेड, व्हेंटिलेटर बेड 99 टक्के रिकामे आहेत. ऑक्सिजन प्लांटसारख्या सुविधा तयार केल्याने आरोग्याचा बाबतीत जिल्हा सक्षम होत आहे.

आयसीयू व ऑक्सिजन बेड रिकामे

नंदुरबार जिल्ह्यात एप्रिल व मे महिन्याच्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रुग्ण संख्या वाढली होती ती आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर जनजागृती करीत उपाययोजना करण्यात आल्या. दररोजचे मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत होते. मात्र जिल्हा प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत आहे. जिल्ह्यात आयसीयू बेड, व्हेंटिलेटर बेड मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. बाराशेपेक्षा अधिक बेड जिल्ह्यात उपलब्ध आहेत. त्यामुळे येणाऱ्या तिसऱ्या लाटेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे.

जिल्हा प्रशासनाकडून जनजागृती

जिल्ह्यात एप्रिल आणि मे महिन्यात कोरोनाने रुद्र रूप धारण केले होते. जिल्ह्यातील एकाही हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक नव्हते. त्यामुळे अनेक रुग्णांना गुजरात राज्यात उपचारासाठी जावे लागत होते. जिल्ह्यातील परिस्थिती हाताबाहेर जात होती. मात्र प्रशासनाने वेळेवर केलेल्या उपाययोजना आणि सातपुडा डोंगररांगांमध्ये असलेल्या विखुरलेल्या वस्तीसोबत लसीकरणासाठी केलेली स्थानिक बोली भाषेत जनजागृती आणि फिरते स्वयंपाक कलेक्शन व्हेन यासारख्या योजनांमुळे जिल्ह्यात आता कोरोना नियंत्रणात आला आहे.

परराज्यातील प्रवासी वाहतूक बंदी

जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये आठ हजारांपेक्षा अधिक रुग्णसंख्या होती. मात्र दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाने कहर केला होता. जिल्ह्यातील दुर्गम भागातदेखील रुग्णसंख्या वाढू लागली होती. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात येणारी बस सेवा आणि प्रवासी वाहतूक बंद केली. सोबत नागरिकांनीही साथ दिली. यामुळेच जिल्हा कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत आहे. त्याचप्रमाणे गुजरात राज्यातून येणाऱ्या प्रवासी वाहनांची तपासणी करण्यात आली होती.

  • एकूण रुग्ण - 37672
    बरे झालेले रुग्ण - 36698
    उपचार घेत असलेले रुग्ण - 27
    कोरोनामुळे मृत्यू - 947

    जिल्ह्यातील सर्वसाधारण बेड - 1272
    ऑक्सिजन बेड - 574
    व्हेंटिलेटर बेड - 162
Last Updated :Jul 14, 2021, 4:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.