ETV Bharat / state

Nana Patole On BJP : मराठा आरक्षणावरुन नाना पटोलेंचा भाजपावर हल्लाबोल; म्हणाले...

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 29, 2023, 5:58 PM IST

Nana Patole On BJP
नाना पटोले

Nana Patole On BJP : नंदुरबार जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि काँग्रेसचा बालेकिल्लाच राहील, असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole attack on BJP) यांनी केलं. (Congress state president) नाना पटोले यांच्या उपस्थितीत आज (रविवारी) नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना भाजपाकडून जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं ते म्हणाले.

मराठा आरक्षणावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

नंदुरबार Nana Patole On BJP : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर नाना पटोले (Nana Patole) यांचा हा पहिला नंदुरबार दौरा असून, आज त्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात दोन ठिकाणी मेळावे झाले. त्यात त्यांनी काँग्रेस पक्षाची रणनीती आणि भाजपाच्या बेगडी हिंदुत्वावर भाष्य केलं आहे. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. मराठा आरक्षणाबाबत राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनाबाबत नाना पटोले म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांच्या मागे कोट्यवधी लोकांचा समूह उभा आहे. गेल्या दहा वर्षांपूर्वी फडणवीसांनी आरक्षणाचं आश्वासन जातींना कोणत्या आधारावर दिलं होतं? आता त्यांना का आरक्षण दिलं जात नाही? हा एक प्रश्न आहे. भाजपा जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

विधानसभा अध्यक्षांचा वेळकाढूपणा : आमदार अपात्र प्रकरणात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे वेळकाढूपणा करतात. 90 दिवसांच्या आत यात निर्णय घ्यावा असा नियम असतानाही दुर्लक्ष केलं जाते. यासंदर्भात सुप्रीम कोर्टानं त्यांच्यावर ताशेरे ओढल्याचे सर्वांनीच पाहिलं. त्यामुळे आमदार अपात्रतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे, असे यावेळी नाना पटोले म्हणाले. महाविकास आघाडीचे 40 ही आमदार निवडून येणार नाहीत, या मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या वक्तव्याचा नाना पटोले यांनी समाचार घेतला. भाजपाला सत्तेची गुर्मी आली आहे. त्यांनी आधी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेऊन दाखवाव्यात, असं आव्हान नाना पटोले यांनी केलं आहे.

भाजपाचं हिंदुत्व नेमकं काय? : भाजपाचं हिंदुत्व हे वेगळं आहे. भाजपाला अजूनही त्यांचं हिंदुत्व काय आहे हे समजलेलं नाही. त्यांनी त्यांचं हिंदुत्व सांगावं. मी पण हिंदू आहे. मी रोज घरातून पूजा केल्याशिवाय बाहेर निघत नाही. काँग्रेसच्या काळात ज्या रामायण आणि महाभारत या मालिका चालू होत्या, या मालिकांमध्ये रावण आणि सीतेचं पात्र करणाऱ्या नायकांना त्यांनी लोकसभेच्या निवडणुकांमध्ये उमेदवारी देऊन खासदार बनवलेलं आहे. नेमकं यांचं हिंदुत्व कसं आहे हे त्यांनी सिद्ध करावं. त्यांनी सीता आणि रामांना कधीच एकत्र येऊ दिलं नाही, असाही टोला यावेळेस नाना पटोले यांनी लगावला आहे.

मोदी है तो मुमकीन है : अध्यक्षांच्या निर्णयापूर्वी देवेंद्र फडणवीस हे वक्तव्य करतात की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र ठरणार नाहीत; कारण की मोदी त्यांच्याकडे आहेत. जे फडणवीस यांच्या पोटात होतं ते त्यांच्या ओठावर आलं आहे. 'मोदी है तो मुमकीन है', असं सांगत भाजपाचा तपास यंत्रणांमधील वाढत्या हस्तक्षेपावर त्यांनी भाष्य केलं आहे.


हेही वाचा:

  1. Mohit Kamboj : उद्धव ठाकरेंचे नवीन सल्लागार कोण? मोहित कंबोज यांनी थेटच सांगितलं...
  2. 106th Episode of Mann Ki Baat : पंतप्रधान मोदींनी केली 'या' नवीन संघटनेची घोषणा, कधी होणार शुभारंभ?
  3. Rhul Narvekar Delhi visit : आमदार अपात्रता प्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, राहुल नार्वेकर दिल्लीला रवाना
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.