ETV Bharat / state

नंदुरबार जिल्ह्यात 66 नव्या कोरोनाग्रस्तांची भर, बाधितांचा आकडा 718 वर

author img

By

Published : Aug 5, 2020, 8:44 PM IST

file photo
file photo

मंगळवारी (दि. 4 ऑगस्ट) रात्री उशीरा प्राप्त अहवालानुसार नंदुरबार जिल्ह्यात 66 नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ झाली असून त्यामध्ये एक ते बारा वर्षे वयोगटातील एकुण 13 चिमुरड्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकुण बाधिंता 718 वर पोहोचला आहे.

नंदुरबार - जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत आहे. एका रात्रीत जिल्ह्यात तब्बल 66 जण कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. यात सर्वाधिक रूग्ण नंदुरबार शहरातील असून एक ते बारा वर्षे वयातील एकुण 13 चिमुरड्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यात नंदुरबार शहरातील एक वर्षीय बालिकेसह 10 लहान मुले व खोंडामळीतील दोन बालकांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या 718 वर पोहोचली आहे. तर मृत्यूची संख्या 39 झाली आहे. सध्या 248 सक्रिय (अॅक्टीव्ह) रुग्ण उपचार घेत असून 407 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

मंगळवारी (दि. 5 ऑगस्ट) सायंकाळी 7 वाजेदरम्यान तिघा वृद्धांच्या कोरोनामुळे मृत्यू झाला. यात नंदुरबार शहरातील देसाईपुरा भागातील एका 71 वर्षीय बाधित पुरुषाचा, नंदुरबार तालुक्यातील 60 वर्षीय महिलेचा आणि शनिमांडळ येथील 65 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तसेच रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालात एकाच वेळी 66 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.

यात नंदुरबार शहरातील कुंभारवाडा देसाईपूरा भागात 62 वर्षीय महिला, 6 वर्षीय बालिका, 10 वर्षीय बालिका, 32 वर्षीय महिला, 42 वर्षीय पुरूष, 6 वर्षीय बालक, 33 वर्षीय महिला, 3 वर्षीय बालिका, 5 वर्षीय बालिका, 44 वर्षीय पुरूष, 20 वर्षीय युवक, 26 वर्षीय युवक, 47 वर्षीय महिला, 70 वर्षीय वृध्द महिला असे 14 जण एकाच भागात पॉझिटीव्ह आले.

तसेच नंदुरबार येथील बाहेरपुर्‍यात 30 वर्षीय पुरूष, रघुकुल नगरात 12 वर्षीय बालक, 43 वर्षीय पुरूष, 38 वर्षीय महिला, भाग्योदय नगरात 1 वर्षीय बालिका, 10 वर्षीय बालिका, 22 वर्षीय युवती, 80 वर्षीय वृध्द महिला, साक्रीनाका भागात 19 वर्षीय युवती, नळवा रोड परिसरात 34 वर्षीय पुरूष, नवापूर रोड परिसरात 47 वर्षीय पुरूष, एलिसानगर धुळे रोड परिसरात 49 वर्षीय पुरूष, कमलकुंज नगर नळवारोड परिसरात 60 वर्षीय पुरूष व नंदुरबार विलगीकरण कक्षातील 28 वर्षीय महिला, 6 वर्षीय बालिका, 4 वार्षिक बालक, 31 वर्षीय पुरुष तर नंदुरबार तालुक्यातील तलवाडे येथे 42 वर्षीय पुरूष, 35 वर्षीय महिला, शनिमांडळ येथे 28 वर्षीय पुरूष, 50 वर्षीय महिला, 42 वर्षीय महिला, 42 वर्षीय महिला, 75 वर्षीय पुरूष, विखरण येथे 55 वर्षीय पुरूष, खोंडामळी येथे 45 वर्षीय महिला, 55 वर्षीय महिला, 35 वर्षीय महिला, 2 वर्षीय बालिका, 8 वर्षीय बालक, 40 वर्षीय पुरूष, 49 वर्षीय पुरूष, करजकुपा येथे 40 वर्षीय महिला, 21 वर्षीय युवती, 7 वर्षीय बालक, 23 वर्षीय युवक, रनाळे येथील माळीगल्लीत 54 वर्षीय पुरूष पॉझिटिव्ह आढळले आहेत.

शहादा शहरातील परिमल कॉलनीतील 41 वर्षीय पुरूष, सोनारगल्लीत 70 वर्षीय महिला, सालदार नगरात 47 वर्षीय महिला, सिद्धार्थ नगरात 51 वर्षीय पुरूष तर शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे 55 वर्षीय पुरूष, 61 वर्षीय पुरूष, 4 वर्षीय बालक, 30 वर्षीय महिला, 50 वर्षीय पुरूष, 62 पुरूष, 51 वर्षीय महिला, 23 वर्षीय युवती, ब्राम्हणपुरी येथे 22 वर्षीय युवती, तळोदा येथील भोईगल्लीत 36 वर्षीय पुरूष, असे एकूण 66 जण नवे पॉझिटीव्ह रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात बाधितांची संख्या 718 वर पोहोचली आहे. मंगळवारी रात्रीपर्यंत 39 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 248 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू असून 407 जण कोरोनामुक्त झाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.