ETV Bharat / state

माझ्या अखत्यारीतील काम करण्याचा अधिकार मला संविधानाने दिलाय- राज्यपाल कोश्यारी

author img

By

Published : Aug 6, 2021, 9:26 AM IST

Updated : Aug 6, 2021, 10:33 AM IST

मी कोणतीही जिल्हा आढावा बैठक घेतली नाही. फक्त मला संविधानाने दिलेले अधिकार वापरून विकासा संदर्भात मी काही अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र, या संदर्भात राजकारण्यांकडून राजकारण केले जात आहे ते त्यांना करू द्या, परंतु पत्रकार तर राजकारण करत नाहीत ना असा उपरोधिक सवाल त्यांनी पत्रकारांनाच केला.

माझ्या अखत्यारीत असलेल्या प्रशासनाशी मी बोललो
माझ्या अखत्यारीत असलेल्या प्रशासनाशी मी बोललो

नांदेड - राज्यपाल भगतसिंह हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यासह काही ठिकाणी आढावा बैठक घेणार असल्याच्या चर्चेवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच राज्यपाल सरकारच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला होता. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या आरोपाला राज्यपाल कोश्यारी यांनी नांदेडमध्ये प्रत्युत्तर देताना म्हटले आहे, की मी कुठलीही आढावा बैठक घेतली नाही. मी माझ्या अखत्यारीत असलेल्या विषयावर प्रशासनातील अधिकाऱ्यांशी बोललो आहे, मला तेवढा संविधानाने अधिकार दिला आहे. नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाला भेट दिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या कुठल्याही विषयावर बोलण्याचे टाळले.

काम करण्याचा अधिकार मला संविधानाने दिलाय- राज्यपाल कोश्यारी
काम करण्याचा अधिकार मला संविधानाने दिलाय- राज्यपाल कोश्यारी
विकास कामासंदर्भात चर्चाच...!राज्यपाल सरकारच्या अखत्यारीत कामांवर अतिक्रमण करीत आहेत, असा आरोप होत असता कोश्यारी म्हणाले की, मी कोणतीही जिल्हा आढावा बैठक घेतली नाही. फक्त मला संविधानाने दिलेले अधिकार वापरून विकासा संदर्भात मी काही अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र, या संदर्भात राजकारण्यांकडून राजकारण केले जात आहे ते त्यांना करू द्या, परंतु पत्रकार तर राजकारण करत नाहीत ना असा उपरोधिक सवाल त्यांनी पत्रकारांनाच केला.
राज्यपाल कोश्यारी

विद्यापीठासाठी भरीव निधी उपलब्ध करून देऊ!

नांदेड दौऱ्यावर असलेले राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विद्यापीठात सुरू असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक करीत विद्यापीठातील विविध उपक्रमास भेटी दिल्या. तसेच यापुढे विद्यापीठासाठी भरीव निधी उपलब्ध करून देऊ, असेही त्यांनी यावेळी आश्वासन दिले. यावेळी राज्यपालांनी विद्यापीठातील रेन वॉटर हार्वेस्टिंग, स्टार्ट अप, अशा विविध उपक्रमांना भेटी दिल्या.

कोविडच्या काळात येता आलो नाही म्हणून आलो...!

यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, कोविडच्या काळात येता आले नाही, म्हणून आतातरी नांदेड पहायला जावं म्हणून हा दौरा आखला असल्याचे राज्यपाल यांनी नांदेड दौऱ्यामागचे कारण स्पष्ट केले. यावेळी त्यांनी स्वाराती विद्यापीठातील वसतिगृह उद्दघाटनाचा कार्यक्रम टाळला. या उद्घाटनावरून उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी टीका केली होती.

राज्यपालांचा दोन सत्ताकेंद्र तयार करण्याचा प्रयत्न' विरोधकांचा आरोप-

विधान परिषदेवरील १२ आमदारांच्या नियुक्त्यांसह विविध मुद्यांवर राजभवन विरुद्ध महाविकास आघाडी सरकारमध्ये रस्सीखेच सुरू आहे. राज्यपालांच्या दौऱ्यावरून राजकारण तापले आहे. राज्यपालांच्या नियोजित परभणी, हिंगोली व नांदेड दौऱ्यातील जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या आढावा बैठका व वसतिगृहांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे तीव्र पडसाद राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले. 'राज्यपाल कोश्यारी हे राज्य सरकारच्या कामात हस्तक्षेप करत आहेत. राज्यपाल दोन सत्ताकेंद्र तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत', अशा शब्दांत मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीव्र नापसंती व्यक्त करण्यात आली. त्यानंतर आता याप्रकरणी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. त्यांनी राज्यपालांचे समर्थन केले आहे.

काही लोकांना मळमळ, देवेंद्रांची टीका

'संविधानाप्रमाणे हे सगळे अधिकार राज्यपालांचे आहेत. राज्यपाल हे प्रमुख आहेत. संविधानाने त्यांनी मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळाला सल्ला देण्यासाठी त्याठिकाणी तयार केलेले आहे. त्यामुळे राज्यपालांना दौरे करु नका असे कोणी सांगू शकत नाही. पीसी अलेक्झांडर किंवा राज्यपाल जमीर यांनी तर महाराष्ट्राच्या एकेका जिल्ह्याचा दौरा केला आहे. मग त्यावेळी हे विषय का आले नाहीत? हे राज्यपाल प्रमाणिकपणे आपले काम करत आहेत. त्यामुळे काही लोकांना मळमळ होतेय. ती मळमळ याप्रकारे बाहेर निघतीय. त्या लोकांना माझा सल्ला आहे, की त्यांनी भारतीय संविधानाचे वाचन करावे आणि त्यानंतर अशी वक्तव्यं करावीत', असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Last Updated :Aug 6, 2021, 10:33 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.