केंद्र सरकारच्या 'या' निर्णयामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार?

author img

By

Published : Aug 22, 2021, 9:52 PM IST

केंद्र सरकारने सोयामिल आयात करून व सूर्यफूल सोयाबीनच्या तेलावरील आयात शुल्क कमी केले आहे

सोयामिल आयात करून व सूर्यफूल सोयाबीनच्या तेलावरील आयात शुल्क केंद्र सरकारने कमी केले आहे. त्यामुळे आता सोयाबीनचे दर तिन-ते चार हजार रुपयांनी कमी झाले आहेत. शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात येईपर्यंत हा दर आणखी कमी होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची वर्तवली जात आहे.

नांदेड - केंद्र सरकारने सोयामिल आयात करून व सूर्यफूल सोयाबीनच्या तेलावरील आयात शुल्क कमी केले आहे. त्यामुळे आता सोयाबीनचे दर तिन-ते चार हजार रुपयांनी कमी झाले आहेत. शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात येईपर्यंत हा दर आणखी कमी होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या चुकीच्या निर्णयामुळे देशातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार असल्याने, केंद्राच्या वरील दोन्ही निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी शेतकऱ्यांनी ग्रामसभेचे ठराव घेऊन केंद्र सरकारला पाठवावेत, असे आवाहन शिवसेना नेते प्रल्हाद इंगोले यांनी केली आहे.

सोयाबीनचा भाव गेला होता दहा हजारावर

कधी नव्हे ते सोयाबीनच्या दराने दहा हजारी ओलांडली होती. या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष झालाच नाही. परंतु, येणाऱ्या हंगामांमध्ये तरी शेतकऱ्यांना समाधानकारक भाव मिळेल. अशी अपेक्षा होती. परंतु केंद्र सरकारच्या चुकीच्या आयात धोरणांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.

आपल्या देशानेच 3 लाख मेट्रिक टन Non-GM सोयामिल केले होते निर्यात

पोल्ट्री उद्योगात खाद्य तयार करतांना 15% सोयाबीन DOC (De-Oiled Cake) म्हणजे सोयामील वापरण्यात येतो. आपल्या देशातील सर्व पौल्ट्री उद्योगाची संपूर्ण वर्षाची सोयामिलची गरज अंदाजे 10 लाख मेट्रिक टन एवढी आहे. देशांतर्गत सोयाबीनच्या उत्पन्नातून अंदाजे 12 ते 14 लाख मेट्रिक टन सोयामिल हे आपल्या देशातून 3 लाख मेट्रिक टन Non-GM सोयामिल निर्यात करण्यात आले. म्हणजे, आपली अंदाजे 10 लाख मेट्रिक टनाची गरज भागवून आपण निर्यात सुद्धा केली आहे.

15 लाख टन सोयमिल होणार आयात

(दि. 11 ऑगस्ट 2021)च्या मत्स्य, पशुसवर्धन व दुग्धव्यवसाय केंद्रीय मंत्रालय यांच्या पत्रांनुसार 15 लाख मेट्रिक टन सोयामीलची आयात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. 15 लाख मेट्रिक टन सोयामीलची आयात करण्याचा निर्णय केंद्र सरकार निर्णय जाहीर होताच बाजारातील सोयाबीनचे दर 4000 ते 5000 हजार रुपये प्रती क्विंटलनी घसरले आहेत. सोयाबीन खरेदी दारांनी सोयामिल आयातीचा बागुलबुवा पुढे करत सोयाबीनचे दर 4300 ते 4000 हजारांनी कमी केले आहेत.

सोयाबीनचे दर प्रचंड घसरण्याची शक्यता

पुढील महिन्यापासून देशांतर्गत सोयाबीनची काढणी चालू होऊन शेतकर्‍याकडील सोयाबीन बाजारात येण्याची वेळ आणि आयात सोयामील देशात येण्याची वेळ एकावेळी येणार असल्यामुळे बाजारातील सोयाबीन दरात प्रचंड घसरण होऊन सोयाबीनचे दर हमीभावाच्या खाली जाण्याची जास्त शक्यता आहे. केवळ पौल्ट्री उद्योगाला फायदा व्हावा म्हणून, हा निर्णय घेण्यात आला. २० ऑगस्ट रोजी सोयाबीन सूर्यफूल तेलाच्या आयातीवरील शुल्क कमी करून शेतकरीविरोधी धोरण राबवले जात आहे.

केंद्र शासनावर दबाव वाढवावा

यावर्षी सोयाबीनच्या दराने दहा हजार रुपयांचा टप्पा ओलांडला त्यामुळे सोयाबीनच्या पेऱ्यात मोठी वाढ झाली. त्यात पाऊसही समाधानकारक झाल्याने, उत्पादनही मोठय़ा प्रमाणावर होईल. परंतु, केंद्राच्या दोन्ही निर्णयांमुळे आताच सोयाबीनचे दर तीन ते चार हजार रूपयांनी कमी झालेत. प्रत्यक्ष शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात आल्यावर तर आणखी मोठ्या प्रमाणावर हे दर कमी होण्याची शक्यता आहे. म्हणून शेतकऱ्यांनी आपल्या गावच्या ग्रामसभेचे ठराव घेऊन केंद्र सरकारला पाठवावेत. तसेच, खासदार यांनाही देऊन सोयाबीन व सूर्यफुलाच्या तेलावरील आयात शुल्क कमी केले ते वाढवावेत यासाठी लोकप्रतिनिधींवर दबाव आणावा असे आवाहन इंगोले यांनी यावेळी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.